मौली धागा बांधण्याचे आहेत विशेष नियम, अनेक जण करतात या चुका

| Updated on: Aug 06, 2023 | 7:55 PM

शास्त्रात मौली धागा  (molly dhaga) धारण करण्याचे आणि उतरवण्याचे अनेक नियम सांगितले आहेत. या नियमांची काळजी घेतली तर अनेक समस्या टळू शकतात. मौली धागा बांधण्याचे आणि काढण्याचे नियम जाणून घेऊया.

मौली धागा बांधण्याचे आहेत विशेष नियम, अनेक जण करतात या चुका
मौली धागा
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : मौली धाग्याला केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर वैज्ञानिकदृष्ट्याही महत्त्वाचे मानतात.  शास्त्रात मौली धागा  (molly dhaga) धारण करण्याचे आणि उतरवण्याचे अनेक नियम सांगितले आहेत. या नियमांची काळजी घेतली तर अनेक समस्या टळू शकतात. मौली धागा बांधण्याचे आणि काढण्याचे नियम जाणून घेऊया. हिंदू धर्मात, मौली धागा संरक्षण धागा म्हणून बांधले जाते. कोणत्याही पूजेनंतर मौली धागा बांधल्याने भगवंताची पूर्ण कृपा व आशीर्वाद प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. त्याच वेळी, मौली धाग्याचा लाल रंग सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो, म्हणून मौली धागा शरीर आणि मनासाठी नेहमीच चांगला मानला जातो.

मौली धागा बांधण्याचे नियम

मौली धागा कोणत्या हातावर बांधणे शुभ असते हे शास्त्रात सांगितले आहे. पुरुष आणि अविवाहित मुलींनी उजव्या हातावर मौली धागा बांधावा. दुसरीकडे, विवाहित महिलांनी डाव्या हातावर बांधणे शुभ मानले जाते.

मौली धागा कसा बांधला जातो?

शास्त्रानुसार ज्या हातात धागा बांधत आहात त्या हातात नाणे किंवा रुपया घेऊन मूठ बंद करा. त्यानंतर दुसरा हात डोक्यावर ठेवा. मौली धागा हातात 3, 5 किंवा 7 वेळा गुंडाळावा. धागा बांधल्यानंतर ज्या व्यक्तीने आपल्या हाताला तो बांधला आहे त्याला आपल्या हातात ठेवलेले पैसे दक्षिणा स्वरूपात द्या.

हे सुद्धा वाचा

कढण्याबाबत काय नियम आहेत?

ज्योतिषशास्त्रानुसार हातात बांधलेला मौली धागा फक्त मंगळवार आणि शनिवारीच काढावा. तो काढल्यानंतर पूजागृहात बसून दुसरा मौली धागा बांधावा. मौली धागा हातातून काढून घेतल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली ठेवा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जीत करा.

या मंत्राचा करा उच्चार

तुमच्यापैकी अनेकांनी हे देखील पाहिले असेल की जेव्हा मंदिरात पुजारी मौली धागा बांधायला घेतात तेव्हा ते मंत्रोच्चार करतात. पण बऱ्याचदा हा मंत्र नेमका कोणता आहे हे आपल्याला कळत नाही. हा मंत्र कोणता आहे आणि त्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

मंत्र-
” ॐ एन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल:
तेन त्वा मनुबधनानि रक्षे माचल माचल ”

रक्षासूत्र किंवा मौली बांधणे हा वैदिक परंपरेचा एक भाग आहे. यज्ञ वगैरेच्या वेळी बांधण्याची परंपरा पूर्वीपासून आहे, पण संकल्प सूत्रासोबत संरक्षण धागा म्हणून बांधण्याचे कारणही आहे आणि त्याचा पौराणिक संबंधही आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)