रविवार उपाय
Image Credit source: Social media
मुंबई : हिंदू धर्मात, प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. रविवार (Ravivar Upay) हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो. सर्व नऊ ग्रहांपैकी सूर्य हा सर्वोच्च आणि पहिला ग्रह मानला जातो. रविवारी सूर्यदेवाची पूजा केल्याने त्यांचा विशेष आशीर्वाद मिळतो. आज आम्ही तुम्हाला रविवारचे काही उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. पैशाच्या तंगीपासून मुक्ती मिळवण्यासाठी रविवारी सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य द्यावे. असे म्हटले जाते की यामुळे सूर्य देवाची कृपा लाभेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. रविवारी गरिबांना लाल रंगाच्या वस्तू दान केल्याने पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
रविवारी करा हो सोपे उपाय
- लाल किताबानुसार नोकरीत प्रगती होण्यासाठी रविवारी नदीत गूळ आणि तांदूळ मिसळून प्रवाहित करावे. यामुळे माणसाची प्रगती होते.
- रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते. त्यामुळे दृष्टी तीक्ष्ण होते. तसेच, कोणताही रोग जवळपास फिरकत नाही.
- उन्हाचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी रविवारी भातासोबत दूध आणि गूळ मिसळून खावे.
- दान करण्यासाठी रविवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. सूर्यदेवाला प्रसन्न करायचे असेल तर गूळ, दूध, तांदूळ आणि कपडे दान करा, असे सांगितले जाते.
- रविवारी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे, असे सांगितले जाते. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
- रविवारी वडाच्या पानावर मनोकामना लिहून पवित्र नदीच्या वाहत्या पाण्यात प्रवाहित केल्यास इच्छित फळ मिळते.
- रविवारी माशांना पिठाचे गोळे बनवून खाऊ घालणे शुभ मानले जाते. यामुळे घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.
- रविवारी घराच्या मुख्य दारावर दोन्ही बाजूला देशी तुपाचा दिवा लावणे खूप शुभ असते. असे मानले जाते की तुपाचा दिवा लावल्याने सूर्यदेव तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यांचा आशीर्वाद लाभतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)