मनी प्लांटशी संबंधीत हे उपाय आहेत खुपच प्रभावशाली, पैशांची चणचण होते दुर

| Updated on: Mar 01, 2023 | 9:24 AM

हिरवीगार झाडे केवळ दिसायलाच चांगली नाहीत तर ते घरात सकारात्मक ऊर्जासुद्धा निर्माण करतात. वास्तूमध्ये अशा अनेक वनस्पतींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांची लागवड घरात सुख-समृद्धी आणते.

मनी प्लांटशी संबंधीत हे उपाय आहेत खुपच प्रभावशाली, पैशांची चणचण होते दुर
मनी प्लांट
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : मनी प्लांट त्याच्या नावाप्रमाणेच उपयुक्त आहे. वास्तुशास्त्रात त्याला अधिक महत्त्व दिलं गेलं आहे. नियमानुसार मनी प्लांट लावल्यास घरात पैशांची कमतरता भासत नाही पण मनी प्लांट (Money Plant) लावताना काही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. वास्तुशास्त्रात मनी प्लांट लावण्याबाबत काही नियम सांगितले गेले आहेत. मनी प्लांट दिसायला जितका सुंदर आहे तितकाच तो वास्तुशास्त्रात शुभ मानला जातो. हा वेल लोकं घराच्या सजावटीसाठी वापरतात, परंतु त्यात अनेक चमत्कारिक गुणधर्म देखील आहेत. ही वनस्पती घरात बरकत आणते. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख, समृद्धी नांदू लागते. वास्तुशास्त्रात मनी प्लांटबाबत काही उपाय सांगण्यात आले आहेत. असे केल्याने मनी प्लांट प्रभावशाली शुभ परिणाम देऊ लागतो. जाणून घेऊया मनी प्लांटशी संबंधीत काही प्रभावशाली उपाय

लाल फित

जर घरात मनी प्लांट ठेवला असेल तर त्याला लाल रंगाची रिबन किंवा रेशमी धागा बांधावा. असे केल्याने करिअरमध्ये झपाट्याने वाढ होते. पैसा मिळण्याची शक्यता वाढते आणि समाजात मान-प्रतिष्ठेत झपाट्याने वाढ होते.

दिशा

घराच्या दक्षिण दिशेला नेहमी मनी प्लांट लावा. असे केल्याने तुम्हाला जलद परिणाम मिळतात. मनी प्लांट मातीच्या भांड्यात किंवा हिरव्या रंगाच्या काचेच्या बाटलीत लावावा. असे केल्याने यशाचे दरवाजे उघडू लागतात.

हे सुद्धा वाचा

दूध

जर मनी प्लांट वाढत असेल तर त्याला कोणत्याही गोष्टीचा आधार देऊन वर उचला. मनी प्लांटची वेल वरच्या दिशेने गेल्यास प्रगती होते. चुकूनही जमिनीवर पसरू देऊ नका. शुक्रवारी मनी प्लांटमध्ये कच्च्या दुधात पाणी मिसळून टाका. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)