ग्रहणाच्या सुतक काळात चुकूनही करू नये या गोष्टी, दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी करा हे उपाय

| Updated on: Oct 09, 2023 | 7:38 PM

सुतक काळ हा अशुभ काळ किंवा दूषित काळ मानला जातो. सुतक काळात देवाची पूजा करण्यास मनाई आहे. याशिवाय मंदिरांचे दरवाजेही बंद असतात.

ग्रहणाच्या सुतक काळात चुकूनही करू नये या गोष्टी, दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी करा हे उपाय
सूर्य ग्रहण
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात चंद्र आणि सूर्यग्रहणाला (Solar Eclipse 2023) विशेष महत्त्व आहे. यावर्षी 14 ऑक्टोबरला सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार 14 ऑक्टोबर रोजी रात्री 8:34 पासून सुरू होईल आणि पहाटे 2:25 पर्यंत राहील. या ग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 51 मिनिटे असेल. हे सूर्यग्रहण 2023 सालातील शेवटचे सूर्यग्रहण असेल. ग्रहणकाळात येणाऱ्या सुतक काळातही विशेष लक्ष द्यावे. धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाचा सुतक कालावधी 12 तास किंवा 9 तास आधी सुरू होतो, ज्यामध्ये सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहणाच्या वेळेच्या 12 तास आधी सुरू होतो. सुतक काळ हा अशुभ काळ मानला जातो, त्यामुळे सुतक काळातही कोणतेही शुभ किंवा धार्मिक कार्य केले जात नाही. या ग्रहणाचा सुतक कालावधी 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:34 वाजता सुरू होईल.

ग्रहण काळात या गोष्टींची काळजी घ्या

  • सूर्यग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये तसेच सूर्यग्रहण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू नये.
  • ग्रहणाच्या वेळी स्वयंपाकघराशी संबंधित कोणतेही काम करू नये, विशेषतः स्वयंपाक करू नये.
  • गरोदर महिलांनी ग्रहण काळात अजिबात घराबाहेर पडू नये.
  • ग्रहणाच्या वेळी सुईमध्ये धागा टाकू नये.
  • सूर्यग्रहण काळात कोणतीही गोष्ट कापू नये, सोलू नये, टोचू नये नये.
  • याशिवाय ग्रहणकाळात मंदिरातील मूर्तीला हात लावू नये.
  • ग्रहणाच्या वेळी सूर्यदेवाचे ध्यान करून त्यांच्या मंत्रांचा उच्चार करावा. सूर्य देवाचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे – ‘ओम ह्रं ह्रीं ह्रौं स: सूर्याय नमः’.
  • याशिवाय सूर्यदेवाचा आणखी एक विशेष मंत्र आहे – ‘ओम घ्रिनिया सूर्याय नमः’.
  • ग्रहणकाळात पसरलेल्या नकारात्मकतेमुळे मोठ्या आवाजात मंत्रांचा जप केल्यास त्याचा परिणाम व्यक्तीवर होत नाही.

 

सूर्यग्रहणानंतर काय करावे?

  • ग्रहणानंतर घर स्वच्छ करून घरभर गंगाजल शिंपडावे.
  • देवघरात ठेवलेल्या सर्व देवी-देवतांच्या मूर्ती आणि फोटोंवर गंगाजल शिंपडावे आणि स्नान करावे.
  • तसेच सूर्यग्रहणानंतर स्नान वगैरे करून दान अवश्य करावे.
  • सूर्यग्रहणानंतर गाईलाही हिरवा चारा द्यावा.
  • ग्रहणकाळात घरातील सर्व पाण्याच्या भांड्यात तुळशीची पाने टाकावे दुधात आणि दह्यातही तुळशी टाकावी. नंतर ग्रहण संपल्यानंतर ती पाने काढून घ्यावी.
  • याशिवाय, ग्रहण सुरू होण्यापूर्वी, काही अन्नधान्य आणि जुने कपडे बाजूला ठेवा आणि ग्रहण संपल्यावर ते कपडे आणि धान्य गरीबाला दान करा. याचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतील.

सुतक कालावधी

सुतक काळ हा अशुभ काळ किंवा दूषित काळ मानला जातो. सुतक काळात देवाची पूजा करण्यास मनाई आहे. याशिवाय मंदिरांचे दरवाजेही बंद असतात. एवढेच नाही तर सुतक काळात खाणे पिणेही निषिद्ध मानले जाते. सुतक कालावधी सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होतो.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)