उज्जैनमध्ये अशा प्रकारे केली जाते भस्म आरती, महादेवाला भस्माचे महत्त्व का आहे?

| Updated on: Mar 09, 2023 | 7:48 PM

मध्य प्रदेशातील उज्जैन या पुरातन शहरातील ‘महाकालेश्वर मंदिर’ तिथल्या भस्म आरतीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

उज्जैनमध्ये अशा प्रकारे केली जाते भस्म आरती, महादेवाला भस्माचे महत्त्व का आहे?
भस्म आरती
Image Credit source: Social Media
Follow us on

उज्जैन : उज्जैन येथे असलेली महाकालेश्वरची भस्म आरती (Mahakaleshwar Bhasma Aarti) जगभर प्रसिद्ध आहे. अशी मान्यता आहे की वर्षांपूवी भगवान महाकालची भस्म आरती अंत्यसंस्काराच्या अस्थीने केली जात होती, परंतु आता ही परंपरा संपुष्टात आली असून आता गौऱ्यांच्या राखेसह आरती-श्रृंगार करण्यात येत आहे. सध्या महाकालच्या भस्म आरतीमध्ये कपिला गाईच्या शेणापासून बनवलेल्या गौरीत शमी, पिंपळ, पळस, वड आणि बोर यांच्या झाडाचे लाकूड जाळून तयार केलेला भस्म वापरला जातो.

तीन प्रकारचे असतात भस्म

जळत्या काड्यांमध्ये औषधी वनस्पती आणि कापूर-गुग्गल यांचे प्रमाण अशा प्रकारे मिसळले जाते की हा भस्म आरोग्याच्या दृष्टीकोनातून तर लाभदायक आहेच शिवाय चवीलाही उत्कृष्ट असते. श्रौता, स्मार्त आणि लौकिक असे भस्माचे तीन प्रकार आहेत. श्रुतीच्या पद्धतीने केलेला भस्म म्हणजे श्रौत, स्मृतीच्या पद्धतीने केलेला भस्म म्हणजे स्मार्त भस्म आणि काड्या जाळून तयार केलेला भस्म म्हणजे लोकिक भस्म.

भस्माबद्दलची धार्मिक मान्यता

शिवाने आपल्या शरीरावर भस्म लावणे याचा तात्विक अर्थ असा आहे की ज्या शरीराचा आपल्याला अभिमान आहे, ज्याच्या सोयीसाठी आपण काय नाही करत, मात्र एक दिवस ते सर्व भस्म होणार आहे. शरीर क्षणभंगुर आहे आणि आत्मा शाश्वत आहे.

हे सुद्धा वाचा

अनेक संन्यासी आणि नागा साधू शरीरावर भस्म लावतात. ही राख त्यांच्या शरीराचे जंतूंपासून संरक्षण तर करतेच पण केसांच्या सर्व कूपांना झाकून सर्दी आणि उष्णतेपासूनही आराम देते.

केशवाहिन्या झाकल्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही, थंडी जाणवत नाही आणि उष्णतेमध्ये शरीरातील ओलावा बाहेर पडत नाही. हे उष्णतेपासून संरक्षण करते. डास, कि़क इत्यादी देखील जळलेल्या भस्मापासून दूर राहतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)