तब्बल 140 किलो सोनं वापरून तयार करण्यात येत आहे हे सर्वात मोठे मंदिर
गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अंबाजी मंदिराचा विकास केला. मुख्यमंत्री या नात्याने नरेंद्र मोदी नवरात्री आणि चैत्र नवरात्रीत अनेकदा अंबाजी मंदिरात दर्शनासाठी येत असत. पंतप्रधान झाल्यानंतरही नरेंद्र मोदी अंबाजीत दर्शनासाठी येतात.
1 / 7
जगातील सर्वात मोठे मंदिर शक्तीपीठ अंबाजी आहे, जिथे भाविक सोन्याचे दान करतात. आतापर्यंत 140 किलो सोन्याचा वापर करून 61 फुटांचे मंदिर बनवण्यात आले आहे.
2 / 7
हे मंदिर गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर असलेल्या अरवली पर्वतराजीच्या टेकड्यांवर आहे. सरस्वती नदी अंबाजीजवळ उगम पावते.
3 / 7
मंदिरात 358 लहान-मोठे सोन्याचे कलश बसवले आहेत, जिथे भक्त चार तास चालत सर्व शक्तीपीठ पाहू शकतात. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे उद्घाटन केले होते.
4 / 7
अंबाजी मंदिर 1200 वर्षे जुने आहे. हे मंदिर संगमरवरी दगडांनी बनलेले आहे. गेल्या 12 दिवसांत लाखो रुपयांचे सोने दान करण्यात आले असून, त्यात ढोलका तालुक्यातील बद्रखा गावातील एका भाविकाने एक किलो सोने दान केले होते, ज्याची किंमत सुमारे 62 लाख रुपये आहे.
5 / 7
21 नोव्हेंबर रोजी मंदिराला एक किलो सोन्याचे बिस्किट भेट देण्यात आले होते. स्वर्ण शिखराच्या बांधकामासाठी वडोदराच्या परम डेव्हलपर्सकडून 22 नोव्हेंबर रोजी 11 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
6 / 7
अंबाजी मंदिरात 6 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने एका भाविकाने 22 नोव्हेंबर रोजी मंदिर ट्रस्टला दान केले होते.
7 / 7
अंबाजी मंदिरात एका भाविकाने स्वर्णशिखराला 181 ग्रॅम सोने दान केले असून त्याची किंमत 10 लाख 16 हजार रुपये आहे.