मुंबई, ज्या प्रमाणे भगवान विष्णूच्या पूजेसाठी एकादशीला महत्त्व आहे. त्याचप्रमाणे भगवान शंकराच्या पूजेसाठी प्रदोषला महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यातील प्रदोष व्रत शुक्रवारी येत असल्याने हा शुक्र प्रदोष व्रत (Shukra Pradosh Vrat 2022) आहे. शुक्र प्रदोष व्रत केल्याने सुख-समृद्धी वाढते, असे मानले जाते. या व्रताचे पालन करून भगवान शिवाची पूजा केल्याने धन, संपत्ती, वैभव आणि सर्व प्रकारच्या भौतिक सुखांची प्राप्ती होते. मृत्यूचे भय दूर होते तसेच अकाल मृत्यू होत नाही अशी धार्मिक मान्यता आहे.
हिंदू दिनदर्शिकेनुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी शुक्रवार, 23 सप्टेंबर रोजी सकाळी 01.17 वाजता सुरू होत आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी, 24 सप्टेंबर, शनिवारी पहाटे 2.30 वाजता संपते. उदयतिथी आणि प्रदोष पूजा मुहूर्तानुसार शुक्र प्रदोष व्रत 23 सप्टेंबर रोजी ठेवण्यात येणार आहे.
23 सप्टेंबर रोजी शुक्र प्रदोष पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 06.17 ते 08.39 पर्यंत आहे. जे लोक या दिवशी उपवास ठेवतात, त्यांना शिवपूजेसाठी 02 तासांपेक्षा जास्त वेळ मिळेल. प्रदोष व्रताची पूजा प्रदोष मुहूर्तावरच करणे महत्त्वाचे आहे.
शुक्र प्रदोष व्रत तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे आणि तुमच्या कार्यात यश मिळवून देणारे आहे, कारण या दिवशी सिद्ध आणि साध्य योग तयार होत आहेत. या दिवशी सकाळपासून सकाळी 9.56 पर्यंत सिद्ध योग असतो. तेव्हापासून, एक साध्य योग आहे, जो दुसऱ्या दिवशी सकाळी 09:43 पर्यंत राहील. हे दोन्ही योग शुभ आहेत.
या दिवशीय स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालून हातात जल, अक्षदा आणि फुल घेत व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर भगवान शंकराच्या मंदिरात किंवा घरात बेलपत्र, धूप, अक्षदा, गंगाजल आदीने भगवान शंकराची पूजा केली पाहिजे. दरम्यान, पंचामृतने अभिषेक केल्यानंतर शिवलिंगवर बेलपत्र, धोतराचे फुल, कन्हेरचे फुल, धूप, दीप, फळ, पान सुपारी आदी अर्पण करावे. पूजा दरम्यान ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जाप करावा. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावत शिव चालीसा पाठ करावा. शेवटी भगवान शंकराची आरती करावी.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)