नाशिक, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbaeshwar Temple) आठ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पाच जानेवारी ते बारा जानेवारी या काळात मंदिर मंदिर बंद होते. संवर्धनाच्या कामासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते. या आठ दिवसांच्या काळात भाविकांना त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी मनाई करण्यात आलेली होती, मात्र आजपासून मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाच्या पिंडीची झीज रोखण्यासाठी वज्रलेप आणि मंदिर देखभाल अशा दोन्ही कामासाठी हे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मंदिराच्या आत गर्भगृहामध्ये असलेल्या शिवलींगाची झिज झाली होती. त्यामुळे शिवलींगाला वज्रलेप लावण्याचे काम पुरातत्व विभागाकडून करण्यात आले. याशिवाय याशिवाय मंदिरातील इतर दुरूस्तीचे काम जे दिर्घ काळापासून प्रलंबित होते तेसुध्दा या कालावधीत पुर्ण करण्यात आले. या काळात मात्र मंदिरात नित्याने केली जाणारी त्रिकाल पूजा सुरू होती.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असल्याने हजारोंच्या संख्येने भाविक येथे दर्शनसाठी येत असतात. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करणाऱ्या भाविकांची येथे मोठी रिघ पाहायला मिळत असते. देवदर्शनासोबतच पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील या स्थळाला विशेष महत्व आहे. याशिवाय श्रावणमहिन्यात सुद्धा मोठी गर्दी येथे होत असते.
श्री त्रयंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर सह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असणारे तीर्थक्षेत्र नाशिक पासुन 28 कि.मी.अंतरावर स्थित आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर वसलेले आहे.हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते तसेच या लिंगाच्या शीर्षामधे सुपारीएवढया आकाराची तीन लिंगे आहेत. ही लिंगे, ब्रह्मा, विष्णु आणि शिव, म्हणजे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या शक्तींची प्रतिक आहेत. ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते.
हे श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी 1755 ते 1786 च्या दरम्यान बांधले. त्याकाळी हे मंदीर बांधण्यासाठी 16 लाख रूपये खर्च आला, आणि साधारणत: 31 वर्षे मंदिराचे बांधकाम सुरू होते. गोदावरी नदीकाठी वसलेले त्र्यंबकेश्वर मंदिर काळ्या दगडांनी बनलेले आहे. मंदिराची वास्तुकला आश्चर्यकारक आहे. कालसर्प शांती, त्रिपिंडी विधी आणि नारायण नागबली यांची पूजा या मंदिराच्या पंचक्रोशीत केली जाते. जे भक्तांनी वेगवेगळ्या इच्छांच्या पूर्ततेसाठी केली जाते.