तुळजाभवानी मंदिरात VIP कल्चरला लगाम, आता संस्थानाकडून नवी नियमावली जारी

| Updated on: Oct 12, 2021 | 7:59 AM

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी वशिलेबाजी आणि सो कॉल्ड व्हीआयपींना लगाम घालण्यासाठी मंदिर संस्थानने व्हीआयपी दर्शन पासची नियमावली जाहीर केली आहे. मंदिराचे विश्वस्त तथा उपविभागीय महसुल अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी आदेश जारी केले आहेत.

तुळजाभवानी मंदिरात VIP कल्चरला लगाम, आता संस्थानाकडून नवी नियमावली जारी
तुळजापूर
Follow us on

उस्मानाबाद : तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी वशिलेबाजी आणि सो कॉल्ड व्हीआयपींना लगाम घालण्यासाठी मंदिर संस्थानने व्हीआयपी दर्शन पासची नियमावली जाहीर केली आहे. मंदिराचे विश्वस्त तथा उपविभागीय महसुल अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी आदेश जारी केले आहेत.

नवी नियमावली काय?

तुळजाभवानी मंदिर येथे देवीच्या दर्शनासाठी महत्वाचे व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीला मोफत अथवा व्हीआयपी दर्शनपास दिला जाणार नाही.

महत्त्वाचे व्यक्ती, त्यांची पत्नी किंवा पती, मुले, आई , वडील तसेच मंत्री महोदय यांचे सोबतचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी यांचा समावेश राहील.

मंत्री यांच्या सोबत असणारे इतर व्यक्तींना घाटशीळ पार्किंग येथूनच दर्शनाचा लाभ होईल.

तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा –

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानी मातेची सोमवारी (11 ऑक्टोबर) नवरात्र उत्सव निमित्त शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली.

भगवान विष्णू सागरामध्ये शेष शैय्येवरती विश्राम घेत असताना मातेने त्यांच्या नेत्र कमलात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून शुंभ आणि निशुंभ असे दोन दैत्य निर्माण झाले त्यांनी शेष शैय्येवरील भगवान विष्णूवरती आक्रमण केले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी विष्णूच्या नेत्र कमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तूती करुन श्रीला जागविले आणि विष्णूवरती आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी मातेने केला म्हणून विष्णूने आपले शेष देवीला विश्राम करण्यासाठी दिले. त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.

देवीच्या अलंकार पूजा –

9 ऑक्टोबर रोजी रथअलंकार महापूजा

10 ऑक्टोबर रोजी ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा

11 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा

12 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा

13 ऑक्टोबरला महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा

14 ऑक्टोबर रोजी घटोत्थापन

15 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा असल्याने पहाटे सिमोल्लंघन हा विधी होणार आहे.

त्यांनतर 19 ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागीरी पोर्णिमेनंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने अन्नदान अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल अशी माहिती महंत तुकोजी बुवा यांनी दिली.

संबंधित बातम्या :

तुळजाभवानी नवरात्रोत्सव; रोज 15 हजार भाविकांनाच दर्शन, पुजारी आणि सेवेकरींसाठीही नियम!

Tuljabhavani Mata | तुळजाभवानी मातेच्या मंदिरात छबिना मिरवणूक, पहिल्या माळेची सांगता