Tulsi Benefits: हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व (Tulsi Importance) आहे. तुळशीचे रोप (Tulsi Puja) अत्यंत पूजनीय मानले जाते. देवी-देवतांना तुळशीची पाने अर्पण करण्याची परंपरा आहे, परंतु भगवान शंकर आणि गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही. तुळशीला हरिप्रिया म्हणतात. हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. घरामध्ये तुळशीचे रोप लावल्याने आणि त्याची पूजा केल्याने जीवनात नवी ऊर्जा येते. शास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप लावून पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. असे मानले जाते की, ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप असते आणि सकाळ-संध्याकाळ पूजा आणि सेवा केली जाते, त्या घरावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. वास्तूमध्ये तुळशीच्या रोपाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. सकारात्मक उर्जेसाठी तुळशीची वनस्पती खूप उपयुक्त आहे. तुळशीच्या रोपाचे महत्त्व आणि पूजेचे नियम इत्यादी जाणून घेऊया.
जर तुमच्या घरी तुळस नसेल आणि तुम्हाला तुळस लावायची असेल तर ती कार्तिक महिन्यात लावावी. कार्तिक महिन्यात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. कार्तिक हा महिना उत्तम मानला जातो. असे म्हटले जाते की, कार्तिक महिन्यात तुळशीचे रोप घरी आणले तर लक्ष्मीचे आगमन होते. कार्तिक महिन्यात गुरुवारी तुळस लावावी. गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस असून श्री विष्णूला तुळस फार प्रिय असते.
वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप नेहमी घराच्या उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावावी. या दिशेला देवतांचा वास असल्याचे म्हटले जाते. घराच्या दक्षिण दिशेला तुळस कधीही लावू नये. जर तुम्ही दक्षिण दिशेला तुळस लावली तर तुम्हाला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते. ईशान्येला तुळशीचे रोप देखील ठेवू शकता. येथे तुळशीची रोप लावल्याने सकारात्मक परिणाम दिसून येतील.
घराच्या प्रवेशद्वारावर किंवा अंगणात तुळस ठेवावी. मात्र, रद्दी, शूज किंवा चप्पल काढलेल्या ठिकाणी तुळशीचे रोप कधीही ठेवू नये. तुळशीचे रोप नेहमी मातीच्या कुंडीत लावावे. प्लास्टिकची कुंडी कधीही वापरू नका. कुंडी ही गेरूने रंगवा आणि शक्य असल्यास त्यावर चुन्याने किंवा हळदीने ‘श्री कृष्ण’ लिहावे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)