हिंदू धर्मामध्ये तुळशीला (Tulsi) शुभ आणि पवित्र मानले जाते. म्हणूनच बहुतेक लोक रोज तुळशीला जल अर्पण (offer water) करतात. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनातील संकटे दूर होतात, अशी धार्मिक मान्यता (religion belief) आहे. यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते. असे म्हटले जाते की, जे लोक तुळशीचे रोप घरात ठेवतात, त्यांना माता लक्ष्मीसह भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. शास्त्रात तुळशीला जल अर्पण करण्यासाठी काही विशेष नियम सांगण्यात आले आहेत. असे म्हटले जाते की, तुळशीशी संबंधित नियमांचे पालन केले नाही तर ते खूप अशुभ परिणाम देऊ शकते. चला जाणून घेऊया तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या विशेष गोष्टींची काळजी घ्यावी.
धार्मिक मान्यता आणि वास्तुशास्त्रानुसार तुळशीला कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये. या दिशेला तुळशी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच या दिशेला तुळशी ठेवल्याने आरोग्यासंबंधी नुकसान होऊ शकते.
तुळशीचे रोप घराच्या छतावर नसावे असे म्हणतात. कारण यामुळे घरात कलहाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. याशिवाय तुळशीसोबत कोणतेही काटेरी रोप लावू नये. ते अशुभ मानले जाते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)