तुळशी उपाय
Image Credit source: Social Media
मुंबई : सध्या अधीक मास सुरू आहे 16 तो ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महादेव शिव शंकरासोबतच श्री हरी विष्णूचा आशीर्वादही या महिन्यात मिळतो. या काळात तुळशीची पूजा केल्याने दुप्पट फळ मिळते आणि जीवनातील संकटे दूर होतात. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मलमासात तुळशीचे हे उपाय केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि शुभ परिणाम प्राप्त होतात. तुळशीचे हे उपाय (Tulsi Upay) पद्मपुराणातही लिहिलेले आहेत.
तुळशीचे उपाय
- दररोज सकाळी स्नान वगैरे करून अधिक मासात जल अर्पण करावे. मात्र रविवारी आणि एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये.
- जल अर्पण करताना ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करावा.
- रोज आंघोळीच्या पाण्यात तुळशीची पाने टाकून आंघोळ केल्याने फायदा होतो. असे केल्याने विष्णूजींचा अनंत आशीर्वाद प्राप्त होतो. तुळशीसमोर संध्याकाळी नियमितपणे तुपाचा दिवा लावावा. यामुळे सुख समृद्धी मिळते.
- अधिकमासात भगवान विष्णूला भोग अर्पण करताना तुळशीची डहाळ अवश्य अर्पण करावी. तुळशीची पूजा केल्यानंतर तुळशीच्या रोपाची प्रदक्षिणा केल्यास शुभ फळ मिळते. अधिक मास दरम्यान तुळशीच्या रोपाला अर्पण केलेली लाल रंगाची चुनरी तुमच्या घराला सुख, समृद्धी आणि संपत्तीचे आशीर्वाद देते.
- तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते. अशावेळी अधिक मासच्या पाचव्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करावा. यामुळे संपत्ती आणि समृद्धी येते. त्याच वेळी शत्रूंचा नाश होतो.
-
तुळशीची पूजा करताना ‘महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आदि व्याधी हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते’ या मंत्राचा जप करावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि साधकाला सुख-समृद्धी मिळते.
-
तुळशीची पाने लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कोणत्याही पैशाच्या जागी ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात. तसेच संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावणे देखील खूप शुभ आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)