मुंबई, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीला तुळशी विवाहाचा (Tulsi Vivah 2022) सण साजरा केला जातो. यंदा तुळशीविवाह 5 नोव्हेंबर, शनिवारी आहे. याच्या एक दिवस आधी एकादशीला भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेनंतर जागे होतात. म्हणजेच देवउठी एकादशी 4 नोव्हेंबरला असेल. तुळशी विवाहाच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात. यासोबतच या उपायांनी पती-पत्नीमधील प्रेमही वाढते. यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरात अपार सुख-समृद्धी राहते.
अनेक वर्षांनंतर असा योग आला आहे की, तुळशीविवाहाच्या दिवशी या वेळी लग्नासाठी मुहूर्त नसेल. शुक्र नक्षत्राच्या अनुपस्थितीमुळे, तुळशी विवाहाच्या दिवशी विवाहासाठी मुहूर्त नाही कारण लग्नासाठी शुक्र नक्षत्राचा उदय होणे आवश्यक आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला वैवाहिक जीवनात सुखाचा कारक मानले जाते.
ज्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या आहेत त्यांनी तुळशी विवाहाच्या दिवशी काही उपाय करावेत. हे उपाय वैवाहिक जीवन प्रेम आणि आनंदाने भरतील. यासाठी तुळशीविवाहाच्या दिवशी पती-पत्नीने पवित्र नदीत स्नान करावे. जर हे शक्य नसेल तर पवित्र नदीच्या पाण्याने घरी स्नान करा. यानंतर स्वच्छ पाण्यात तुळशीची पाने टाका आणि काही वेळाने हे पाणी संपूर्ण घरात शिंपडा.
यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढते. याशिवाय पती-पत्नीने तुळशीविवाहात एकत्र सहभागी व्हावे. तुळशीमातेला लाल चुनरी आणि सोळा श्रृंगार अर्पण करा. शक्य असल्यास घरात तुळशीविवाह करा. असे केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)