मुंबई : प्रत्येक वारकरी वर्षभर ज्या सोहळ्याची वाट पाहत असतो तो सोहळा म्हणजे आषाढी वारी (Aashadhi Wari 2023). यंदा ही वारी 11 जून ते 29 जून याकालावधीत होणार आहे. या संपूर्ण वारीचं प्रक्षेपण दाखवण्यासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 वृत्तवाहिनी tv9 मराठीही सज्ज झाली आहे. गेली अनेक वर्ष वारीतली प्रत्येक गोष्ट tv9 मराठी प्रेक्षकापर्यंत पोहचवत आहे.
याही वर्षी आळंदीतून माऊलीच्या पालखीचे प्रस्थान ते पंढरपूर पर्यंतचा संपूर्ण प्रवास….या प्रवासात होणारे उभे रिंगण, गोल रिंगण, नीरा स्नान, भारूड तसेच या प्रवासादरम्यान घडणारी प्रत्येक गोष्ट tv9 मराठी तुम्हांला दाखवणार आहे. सोबत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रवास देखील तुम्हांला अनुभवता येणार आहे. या वारीत विशेष म्हणजे tv9 ची LED वॅन देखील असणार आहे. ज्यावर भाविक वारीतदेखील जगभरातील बातम्या पाहू शकणार आहेत. तसेच त्या LED वॅनजवळ भाविक भजन कीर्तनाचा आनंद घेऊ शकणार आहेत.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी ग्रीन हार्वेस्ट आणि विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन हे प्रस्तुतकर्ता आहेत. तर असोसिएट स्पॉन्सर म्हणून विद्या आराधना अकॅडमी, राजर्षि शाहू सहकारी बँक पुणे, जमीन प्रा.लि., आयडियल अग्री सर्च आणि सोसायटी टी आहेत.