मुंबई : हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्या आहेत. वैशाख महिन्याची अमावस्या (Vaishakh Amavashya 2023) खूप खास असते कारण या दिवशी एक नव्हे तर तीन खास प्रसंग येतात. शनि जयंतीही वैशाख अमावस्येला येते आणि या दिवशी विवाहित महिला वट सावित्री व्रत पाळतात. वैशाख अमावस्येच्या दिवशी स्नान, दान, व्रत, वटवृक्षाची पूजा केल्याने खूप फायदा होतो. यावर्षी वैशाख अमावस्या 19 मे रोजी येत आहे. जाब, दिल्ली, ओडिशा, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये वट सावित्री व्रत या 19 मे म्हणजेच अमावस्येला पाळले जाते. या दिवशी शनी जयंतीही साजरी केली जाणार आहे. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो, याशिवाय शनिदेव, भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचाही आशीर्वाद असतो.
ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सात जन्मांची पापे धुतले जातात. याशिवाय या दिवशी अवश्य करावे, यामुळे पितर प्रसन्न होतात. हिंदू कॅलेंडरनुसार, ज्येष्ठ अमावस्या तिथी 18 मे 2023 रोजी रात्री 9.42 वाजता सुरू होईल आणि 19 मे 2023 रोजी रात्री 9.22 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार 19 मे, शुक्रवार हा ज्येष्ठ अमावस्या मानला जाईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)