वरुथिनी एकादशीचे महत्त्व काय ? , उद्या हे उपाय नक्की करा आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही!

| Updated on: Apr 25, 2022 | 1:03 PM

 हिंदू (Hindu) धर्मातील प्रत्येक एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित असते. या दिवशी लोक उपवास (Fast) करतात, देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूच्या आईची विशेष प्रार्थना करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात.

वरुथिनी एकादशीचे महत्त्व काय ? , उद्या हे उपाय नक्की करा आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही!
vishnu
Follow us on

मुंबई : हिंदू (Hindu) धर्मातील प्रत्येक एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित असते. या दिवशी लोक उपवास (Fast) करतात, देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूच्या आईची विशेष प्रार्थना करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात. यापैकी काही एकादशी अतिशय विशेष मानल्या जातात. वैशाख महिन्यातील कृष्ण (Krushna) पक्षातील एकादशी देखील यापैकीच एक आहे. या दिवसाला वरुथिनी एकादशी 2022 असे म्हणतात. यावेळी वरुथिनी एकादशी मंगळवार, 26 एप्रिल रोजी येणार आहे. पौराणिक कथेनुसार भगवान शिव रागात  ब्रह्मदेवाचे पाचवे शिर कापले. ज्यामुळे त्यांना शाप लागला. या शापातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवने वरुथिनी एकादशीचे व्रत केले. हे व्रत केल्याने भगवान शिव शापातून मुक्त झाले. धार्मिक मान्यतांनुसार, हे व्रत पाळल्याने अनेक तपस्यांइतकं फळ मिळतं अशी मान्यता आहे.

वरुथिनी एकादशीचं महत्त्व
वरुथिनी एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने घरात यश, संपत्ती आणि सुख-समृद्धी येते. या व्रताचे पालन केल्याने मोक्ष प्राप्त होतो. हे व्रत ठेवल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात, अशी मान्यता आहे.

वरुथिनी एकादशी तिथी
वैशाख महिन्यात कृष्ण पक्षात पडणारी एकादशी वरुथिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. यावेळी वरुथिनी एकादशी 26 एप्रिल 2022 रोजी येत आहे. या दिवसाला भगवान विष्णूच्या वामन अवताराची पूजा केली जाते.

एकादशी उपवासाची वेळ – 26 एप्रिल 2022 रोजी सकाळी 05.35 ते सायंकाळी 08:16 अशी असेल.

वरुथिनी एकादशीचा पूजा विधी
वरुथिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि घराच्या मंदिरात दिवा लावावा.

त्यानंतर भगवान विष्णूंचा अभिषेक करावा आणि त्यांना नवीन वस्त्र घालावे. मग विधीवत पूजा करावी.

भगवान विष्णूच्या आवडीचे पदार्थ वरुथिनी एकादशीला नैवेद्य म्हणून दाखवाव्या.

दुसर्‍या दिवशी द्वादशीचे व्रत सोडावे.

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | लग्नासाठी मुली बघताय ? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा

‘पितृदोष’ आणि ‘वास्तुदोष’ दूर करण्यासाठी कापूर वापरून करा हे उपाय… सर्व त्रास होतील दूर !

24-30 April 2022, साप्ताहिक राशिभविष्य : कन्या राशीसाठी कठीण असेल काळ, पहा इतर राशींसाठी संपूर्ण आठवडा कसा राहील..