एकादशी
Image Credit source: Social Media
मुंबई : येत्या रविवारी म्हणजेच 16 एप्रिलला वरुथिनी एकादशी (Varuthini Ekadashi 2023) येत आहे. पुराणात या एकादशीचे वेगळे महत्व सांगण्यात आले आहे. श्रीविष्णूच्या वराह रुपाची या एकादशीला पूजा केली जाते. शुक्ल आणि कृष्ण पक्षात दर महिन्याला एक एकादशी येते. अशाप्रकारे वर्षाला एकंदरीत 24 एकादशी येतात. प्रत्येक एकादशीचं महत्व पुराणात वेगळे सांगण्यात आले आहे. या शुभ तिथीला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी व्रत, जप आणि उपासना करण्याची परंपरा आहे.
वरुथिनी एकादशीचे व्रत जो नियमानुसार करतो, त्याच्यावर श्री हरिची कृपा होते, असे मानले जाते. वरुथिनी एकादशीचे व्रत केल्याने साधकाच्या जीवनातील सर्व संकटे क्षणात दूर होतात आणि सुख, सौभाग्य आणि आरोग्य प्राप्त होते. वरुथिनी एकादशी व्रताच्या दिवशी करावयाची पूजा पद्धती आणि त्यासंबंधीचे निश्चित उपाय जाणून घेऊया.
वरूथिनी एकादशीला अवश्य करा हे उपाय
- वरुथिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेसाठी वापरण्यात येणारा शंख संपूर्ण घरामध्ये गंगाजलाने शिंपडल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक उर्जेसह सुख आणि सौभाग्य कायम राहते.
- वरुथिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना लवकर प्रसन्न करून त्यांच्याकडून इच्छित वरदान मिळावे म्हणून त्यांच्या पूजेत अर्पण केलेल्या भोगामध्ये ते तुळशीचे पान, ज्याला हिंदू धर्मात विष्णुप्रिया असे म्हणतात, ते अवश्य अर्पण करावे.
- भगवान श्री विष्णूच्या पूजेमध्ये पिवळ्या वस्तूंचा वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते अशी हिंदूंची श्रद्धा आहे. अशाप्रकारे वरुथिनी एकादशी व्रताच्या दिवशी केवळ पिवळे वस्त्र, पिवळी फुले, पिवळे चंदन, पिवळी फळे आणि पिवळ्या मिठाईने भगवान विष्णूची पूजा न करता स्वतः पिवळे वस्त्र परिधान करा.
- वरुथिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीविष्णूची कृपा प्राप्त होण्यासाठी गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचा दिवा लावून पूजा व आरती करावी. असे मानले जाते की एकादशीच्या पूजेमध्ये हा उपाय केल्यास हरीची कृपा लवकर होते.
- या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ अवश्य करावा. धार्मिक मान्यतांनुसार भगवान श्री विष्णूच्या पूजेमध्ये शंखाचा वापर अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. असे मानले जाते की वरुथिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूच्या मूर्तीला शंखाने स्नान घातले आणि पूजा करून शंख वाजविला तर श्री हरी लवकरच प्रसन्न होऊन साधकाला इच्छित वरदान देतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)