मुंबई : कॅलेंडरनुसार, वसंत पंचमी (Vasant Panchami 2024) हा सण दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने ज्ञान, विद्या, संगीत आणि कलेची देवी माता सरस्वती यांना समर्पित आहे. या दिवशी देवी सरस्वतीचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. असे मानले जाते की वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वती पांढऱ्या कमळावर पुस्तक, वीणा आणि हार घेऊन विराजमान झाल्या होत्या, म्हणून या दिवशी माता सरस्वतीची विशेष पूजा केली जाते. तसेच वसंत पंचमीपासून वसंत ऋतु सुरू होतो. शास्त्रानुसार वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केल्याने माता लक्ष्मी आणि देवी कालीही प्रसन्न होतात. अशा परिस्थितीत 2024 सालातील सरस्वती पूजेची तारीख म्हणजेच वसंत पंचमी, पूजेची वेळ आणि पूर्ण पूजा पद्धती जाणून घेऊया.
पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी १३ फेब्रुवारीला दुपारी २:४१ वाजता सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:09 वाजता संपेल. 14 जानेवारीला उदया तिथी येत असल्याने यंदा वसंत पंचमीचा सण 14 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे.
14 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी 7.01 ते दुपारी 12.35 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल. अशा स्थितीत या दिवशी पूजेसाठी तुमच्याकडे जवळपास 5 तास 35 मिनिटे वेळ आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)