Vastu Tips: किचनपासून बाथरूमपर्यंत सर्व वास्तूदोष होतील दूर; फॉलो करा ‘या’ सोप्या ट्रिक्स…

| Updated on: Jan 11, 2025 | 5:35 PM

Vastu Tips: हिंदूधर्मानुसार, वास्तूशास्त्राला वेगळचं महत्त्व आहे. प्राचीन काळापासून कोणत्याही प्रकाच्या बाधकामांपूर्वी त्या जोगेची वास्तू तपासली जाते. मान्यतेनुसार, कोणत्याही घराचा किंवा जागेचा एक वास्तूी पुरुष असतो ज्यामुळे तुम्हाला फायदे आणि तोटे काही होऊ शकतात. त्याच प्रमाणे घरातील वस्तू वास्तू प्रमाणे नसतील तर त्या घरामध्ये वास्तू दोष निर्माण होतो. चला तर जाणून घेऊया घरातील वास्तूदोष कसा दूर करावा?

Vastu Tips: किचनपासून बाथरूमपर्यंत सर्व वास्तूदोष होतील दूर; फॉलो करा या सोप्या ट्रिक्स...
Follow us on

वास्तूशास्त्रानुसार, घर बनवताना वास्तूच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असते. वास्तू्च्या नियमांचे पालन केले नाही तर घरातील सदस्यांना वास्तू दोषाच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. तुमच्या घरामधील प्रत्येक खोली प्रत्येत कोपऱ्यामध्ये वास्तू पुरुषाचा वास असतो. त्यामुळे योग्य जावी योग्य गोष्ट नाही ठेवल्यास वास्तूदोष निर्माण होतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर वास्तूदोषामुळे त्रस्त असाल तर घरातील वास्तूमध्ये सुधार करू शकता. या गोष्टी केल्यामुळे तुमच्या घरामधील वास्तूदोष कमी होतो आणि त्यामुळे होणारे त्रास हळूहळू कमी होतात.

तुमच्या घरातील खोलीचा आणि स्वयंपाकघराची दिशा योग्य असणे गरजेचे असते. जर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वास्तूदोष जाणवत असेल तर काही सोप्या टिप्स केल्यास आयुष्यातील अडथळे कमी करण्यास मदत करतात. तुमच्या घराच्या आग्नेय दिशेला लाल रंगाचा बल्ब लावा आणि दिवसभरात किमान सहा तास तो प्रज्वलित ठेवा. असे केल्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरातील वास्तूदोष कमी होण्यास मदत होते. हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील अग्नि तत्व संतुलित होण्यास मदत होते ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदते.

रात्रीच्या वेळी तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ आणि चांगलं ठेवा. स्वयंपाकघरातील असे अनेक भांडी असतात ज्यांचा काही उपयोग नसतो, या भांड्यांना त्यांच्या जागेवर ठेवलं पाहिजेल ज्यामुळे स्वयंपाकघरामध्ये फ्रेश वाटतं. तुमच्या स्वयंपाकघरातील नळ सारखे गळत असतील तर तुमच्या घरातील धनसंपत्ती निघून जाते. तुमच्या बेडरूमधील वास्तूदोष दूर करण्यासाठी तुमच्या पलंगाच्या वरच्या भागामध्ये क्लिअर क्रिस्टल क्वार्ट्ज ठेवा त्यासोबतच तुमच्या रूममध्ये एका भांड्यामध्ये समुद्री मीठ त्यामध्ये लवंग आणि काही कापराच्या वड्या ठेवा यामुळे तुमच्या रुममध्ये सकारात्मकता वाढते. तुमच्या बेडरुमचा ईशान्य कोपरा नेहमी रिकामा असणं गरजेचे आहे. तुमच्या बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारची तुटलेली वस्तू ठेवू नका यामुळे तुमच्या बेडरूममुळे नकारात्मकता येते.

बाथरूममधील वास्तू दोष दूर करण्यासाठी एका कोपऱ्यात एका भांड्यात मीठ आणि कही लवांगाचे तुकडे ठेवा. यामुळे वास्तुदोष दूर राहतात. याशिवाय तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली देखील ठेवू शकता. बाथरूममध्ये गडद रंगाच्या टाइल्स वापरू नयेत आणि भिंतींचा रंगही हलका असावा हे लक्षात ठेवा. या गोष्टी लक्षात ठेवल्यास वास्तुदोषांपासून दूर राहू शकता.