नव्या वर्षात घरामध्ये येईल पैसाच पैसा, तुळशीचे ‘हे’ उपाय तुम्हाला करतील मालामाल…

| Updated on: Dec 21, 2024 | 8:16 PM

astro tips : धार्मिकमान्यतेनुसार, तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप लावल्यामुळे घरातील सदस्यांना लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो आणि जीवन सुखी होते. जीवनात यश मिळवण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीच्या रोपाला काही गोष्टी अर्पण करणे फायदेशीर ठरते.

नव्या वर्षात घरामध्ये येईल पैसाच पैसा, तुळशीचे हे उपाय तुम्हाला करतील मालामाल...
Follow us on

हिंदूधर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र स्थान मिळाले आहे. कोणत्याही पूजेला किंवा देवाला नैवेद्य अर्पण करताना त्यावर तुळशीचे पान ठेवले जाते. अनेक घरांमध्ये तुळशीची पूजा देखील केली जाते. ग्रंथांच्या मान्यतेनुसार, श्री हरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. दररोज सकाळी तुळशीच्या रोपाची पूजा केल्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. नियमित तुळशीची पूजा केल्यामुळे तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा रहाते. काही दिवसांमध्ये नव्या वर्षांला सुरुवात होणार आहे.

नवं वर्ष त्याच्यासोबत काही नविन गोष्टी घेऊन यंत असं म्हटलं जेतं. तर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही काही उपाय केल्या तुमच्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होऊ शकते. तसेच अनेक घरांमध्ये नकारात्मक वातावरण पहायला मिळतं. तर तुळशीच्या या उपायांमुळे तुमच्या घरातील नकारात्मक उर्जा निघून घरामध्या प्रसन्न वातावरण निर्माण होऊ शकते. चला तर जाणून घेऊया शास्त्रानुसार तुळशीचे सोपे उपाय.
देवी लक्ष्मी प्रसन्न होईल

तुमच्या आयुष्यातील संकटांपासून मुक्त होण्यासाठी, नव्या वर्षातील पहिल्या दिवशी तुळशीच्या रोपाची सकाळी लवकर उठल्यावर पूजा करा. त्यारोपाला जल अर्पित करा आणि त्याच्यासमोर छेटासा दिवा लावा. त्यानंतर तुमच्या घरातील सुख शांती आणि समृद्धीसाठी देवाकडे प्रर्थना करा. हा उपाय केल्यास तुमच्या जीवनातील अडचनींपासूनन मुक्ती मिळण्यास मदत होईल आणि देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न राहील.

धनाची भरभराट होईल

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी उठल्यावर स्वच्छ स्नान करा. त्यानंतर तुमच्या घरातील तुळशीच्या रोपाला जल अर्पण करून त्याची पूजा करा आणि तुळशीच्या रोपाला चांदीचचे नाणेही बांधा. तुळशीलला चांदीचे नाणे बांधल्यामुळे तुम्हाला धनाची प्राप्ती होते. चांदीला सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

नकारात्मकता दूर होईल

तुमच्या घरामध्ये आर्थिक चणचण भासत असेल किंवा पैसा टिकत नसेल. तर घरातील तुळशीच्या रोपाला स्वास्तिक चिन्ह बांधावे यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता निधून जाते. त्यासोबतच घरातील वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न होण्यास मदत होते. दररोज सायंकाळी तुळशीच्या रोपा समोर दिवा लावल्यामुळे देखील घरामध्ये सकारात्मकता येते.

यशाचे मार्ग मोकळे होतील

तुमच्या घरातील तुळशीच्या रोपाला उसाचा रस अर्पण करा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या कामांमधील अडचणी दूर होतात. त्यासोबतच कुटुंबामध्ये सुख शांती कायम रहाण्यास मदत होते.

वैवाहिक जीवन आनंदी राहील

तुळशीची पूजा करताना रोपाला शृंगाराचे सामान अर्पण केल्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामधील मतभेद कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच पती पत्नीमधील नाते आणखी घट्ट होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)