Vastu Shastra : दरवाज्याच्या दिशेने पाय ठेवून झोपणं शुभ की अशुभ ?

| Updated on: Jul 18, 2024 | 1:49 PM

Vastu Shastra : दरवाज्याच्या दिशेने पाय करून झोपणं भारतीय परंपरा आणि मान्यतांनुसार अशुभ मानले जाते. यामागील कारण काय, तसेच त्यामागील धार्मिक, सांस्कृतिक, स्थापत्य आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून होणारे परिणाम याबद्दल जाणून घेऊया.

Vastu Shastra : दरवाज्याच्या दिशेने पाय ठेवून झोपणं शुभ की अशुभ ?
Image Credit source: freepik
Follow us on

धार्मिक, सांस्कृतिक आणि वास्तु शास्त्रानुसार दरवाज्याच्या दिशेने पाय ठेवून झोपणे अशुभ मानले जाते. भारतात अनेक परंपरा आणि श्रद्धा आहेत, ज्यापैकी अनेकांचा आपल्या दैनंदिन जीवनावर प्रभाव पडतो. असाच एक समज असा आहे की दरवाजाकडे पाय ठेवून झोपणे अशुभ असते आणि हा समज पिढ्यानपिढ्या चालत आला आहे. आपल्यापैकी बरेच जण यावर विश्वास ठेवतात. या विषयावर चर्चा करण्यापूर्वी, या मागील कारणे काय असू शकतात आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे समजून घेणे आवश्यक आहे. या लेखात आपण धार्मिक दृष्टिकोनापासून वास्तुशास्त्रापर्यंत आणि शास्त्रज्ञांच्या मते या श्रद्धेमागचे विविध पैलू समजून घेणार आहोत. दाराकडे पाय ठेवून झोपणे खरोखर शुभ आहे की अशुभ हे जाणून घेऊया.

धार्मिक दृष्टिकोन

भारतीय संस्कृतीत असे मानले जाते की दरवाज्याच्या दिशेने पाय ठेवून झोपणे अशुभ असते. कारण अशा प्रकारे झोपल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि माणसाच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात. धार्मिक मान्यतांनुसार, देव आणि पूर्वजांची ऊर्जा दारातून घरात प्रवेश करते. त्यामुळे दरवाज्याच्या दिशेने पाय ठेवून झोपल्याने या ऊर्जेमध्ये व्यत्यय येतो. आणि व्यक्तीच्या समृद्धी आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

वास्तु शास्त्र काय म्हणतं ?

वास्तुशास्त्रानुसार दरवाज्याच्या दिशेने पाय ठेवून झोपणे अशुभ मानले जाते. झोपताना आपलं डोकं पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते. यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. आणि व्यक्तीचे आरोग्य, संपत्ती आणि सुख-समृद्धी वाढते. मात्र दरवाजाच्या दिशेने पाय ठेवून झोपल्याने नकारात्मक ऊर्जा प्रसारित होते, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक अडथळे येतात.

वैज्ञानिक दृष्टिकोन

वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार दरवाज्याच्या दिशेने पाय ठेवून झोपले तर त्यात नुकसान काहीच नाही. हे पूर्णणे मिथक आहे. उत्तरेकडे डोकं ठेवून झोपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य मानले जात नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर माणसाला चांगली झोप येईल अशा पद्धतीने झोपावे. त्यामुळे त्याला शारीरिक आणि मानसिक विश्रांती मिळू शकते.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून

आरोग्याच्या दृष्टिकोनातून पहायला गेलं तर एखादी व्यक्ती ज्या दिशेने झोपते त्याचा त्याच्या झोपेवर आणि आरोग्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, उत्तरेकडे डोके ठेवून झोपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य मानले जात नाही कारण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. या कारणास्तव, उत्तरेकडे डोके ठेवून झोपल्याने रक्तदाब वाढू शकतो आणि झोपेच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होऊ शकतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)