Vastu Tips | मनी प्लांट लावताना या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा

| Updated on: Feb 27, 2022 | 3:12 PM

घर (Home) पंचमाहाभूतांनी बनलेले असते. वास्तु (Vastu) आणि ज्योतिष शास्त्रामध्ये घरात सुख-समृद्धीचे वातावरण राहण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत .

Vastu Tips | मनी प्लांट लावताना या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा
money-plant-vastu-tips
Follow us on

मुंबई :  घर (Home) पंचमाहाभूतांनी बनलेले असते. वास्तु (Vastu) आणि ज्योतिष शास्त्रामध्ये घरात सुख-समृद्धीचे वातावरण राहण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत . घर बनवताना दिशेच्या ज्ञानासोबतच वास्तू आणि ज्योतिष शास्त्रामध्ये त्यामध्ये कोणत्या गोष्टी ठेवाव्यात, याबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार , जर या नियमांकडे दुर्लक्ष केले गेले, तर यामुळे वास्तु दोष (Vastu Dosh) घरात दार ठोठावतात , ज्याचा परिणाम केवळ आर्थिकच नाही तर शारीरिकदृष्ट्याही होतो. इतकंच नाही तर घरात ठेवलेल्या रोपांची योग्य माहिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे. घराची सजावट करण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या गोष्टींचा अवलंब करत असतो. अशातच बऱ्याच घरांमध्ये मनी प्लांटचा वापर केला जातो. असे मानले जाते की हे घरामध्ये लावल्याने पैशाची कमतरता दूर होते आणि धन कमाईचे अनेक मार्ग देखील खुले होतात अशी मान्यता आहे. मात्र, ते लावताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

ही दिशा निवडा
वास्तूनुसार, मनी प्लांट गॅलरी, बागेत किंवा इतर ठिकाणी ठेवताना, आग्नेय कोपरा या गोष्टीसाठी शुभ मानली जाते. असे म्हणतात की या दिशेला मनी प्लांट लावल्यास
घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरातील सदस्यांमध्येही सकारात्मक ऊर्जा राहते. एवढेच नाही तर घरातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे मनी प्लांट लावताना योग्य दिशा जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

कच्ची जमीन
आजकाल शहरातील बहुतेक लोक काचेच्या बाटल्यांमध्ये मनी प्लांट्स फक्त भांड्यात ठेवतात. यामुळे घराला स्टायलिश लुक येतो, पण असे करणे वास्तू दोषाचे
कारण असू शकते. घरामध्ये कच्ची जमीन नसेल तर मनी प्लांट लावू नये. असे मानले जाते.

कोरडी पाने
तुम्ही लावलेल्या मनी प्लँटमध्ये जर कोरडी पाने दिसत असतील तर ती काढण्यास उशीर करू नका. असे म्हटले जाते की ते न काढल्याने घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तसेच तुमच्या झाडाची पाने जमिनीला अजिबात स्पर्श करू नयेत, कारण वास्तूमध्ये ते खूप अशुभ मानले जाते.

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या मते, ‘या’ 5 गोष्टी समजून घेतल्या तर, सर्वात मोठे संकट ही आल्या पावली निघून जाईल

सर्व अपुऱ्या इच्छा पूर्ण होतील, केशराचे हे उपाय नक्की करुन पाहा

महादेवाच्या पंचाक्षर स्तोत्राने अशक्य गोष्टी शक्य होतील, महाशिवरात्रीला ‘हा’ पाठ नक्की वाचा!