देवघरात ‘या’ वस्तू चुकूनही ठेऊ नका, अन्यथा नकारात्मक ऊर्जा येईल…

| Updated on: Dec 15, 2024 | 5:30 PM

आपल्या घरातील देवघर हे सर्वात पवित्र स्थान आहे, जिथून संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. अशावेळी मंदिरातील त्या गोष्टी कधीही ठेऊ नका, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. वास्तुशास्त्रानुसार या वस्तू मंदिरात किंवा आजूबाजूला कधीही ठेवू नयेत.

देवघरात या वस्तू चुकूनही ठेऊ नका, अन्यथा नकारात्मक ऊर्जा येईल...
Follow us on

वास्तूशास्त्रानुसार घरातल्या प्रत्येक स्थानाला खूप महत्व आहे. विशेषतः आपल्या घरातील देवघर वास्तूमध्ये खूप महत्वाचे मानले जाते. आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर हे असतं. देवघराशिवाय आपल्या घराला घरपण येत नाही त्यामुळे आपण नेहमी जेव्हा घर बांधतो तेव्हा देवघर कसा कुठे असावा हे वास्तुनुसार ठरवतो. घरातील देवघर हे असे ठिकाण आहे जिथून घरासाठी सर्वात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. मंदिरातून निघणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा लाभ घरातील सर्व लोकांना होतो. वास्तुशास्त्रातही घरातील देवघर अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. आणि पूजेसंबंधीचे काही खास नियमही वास्तुशास्त्रात सांगितले आहेत. वास्तुशास्त्रानुसार घरामधील देवघरात काही गोष्टी ठेवू नयेत. या वस्तू मंदिरात ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते. वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया घरातील मंदिरात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

घरातील मंदिरात ठेवू नका या वस्तू

घरातील देवघरात चुकूनही पितरांचे फोटो लावू नका. असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. देवघरात पूर्वजांचे फोटो लावल्याने देवाचा अपमान होतो. जर तुमच्या देवघरात किंवा आजूबाजूला पूर्वजांची फोटो असतील तर ती काढून टाकावीत.

घराच्या देवघरात कधीही फाटलेली किंवा जुनी पुस्तके ठेवू नयेत. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

हे सुद्धा वाचा

देवघरात वाळलेली व सुकलेली फुले ही काढून टाकावीत. असे न केल्याने जीवन नकारात्मकतेने भरलेले राहते.

घराच्या देवघरात जास्त शंख लावू नयेत. भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी घरातील मंदिरात पांढरा शंख ठेवावा.

घरातील देवघरात शनिदेवाची मूर्ती ठेऊ नये. हे विसरता कामा नये. हिंदू मान्यतेनुसार महिलांसाठी शनिदेवाचे दर्शन अशुभ मानले जाते.

वास्तुशास्त्र सांगते की, जर एखादी मूर्ती तुटली किंवा खराब झाली तर तिला घरात किंवा देवघरात स्थान देऊ नये. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा येते.

देवघरात शिवलिंग ठेवले असेल तर ते अंगठ्याच्या आकाराचेही आहे याची खात्री करून घ्या. यापेक्षा मोठे शिवलिंग घरात नसावे.

घरातील देवघर आणि आजूबाजूची जागा स्वच्छ असावी. कारण लक्ष्मी देवीचा वास स्वच्छ ठिकाणी कायम राहतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )