Vastu Tips: घराच्या छतावर चुकूनही ठेवू नका या गोष्टी, अन्यथा करावा लागतो आर्थिक समस्येचा सामना

| Updated on: Apr 18, 2023 | 3:21 PM

वस्तू जर योग्य ठिकाणी ठेवली असेल तर त्याचा परिणाम सकारात्मक होतो याउलट जर ती वस्तू चूकीच्या ठिकाणी ठेवली असेेल तर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो.

Vastu Tips: घराच्या छतावर चुकूनही ठेवू नका या गोष्टी, अन्यथा करावा लागतो आर्थिक समस्येचा सामना
वास्तूशास्त्र
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : वास्तुशास्त्रात (Vastu tips) प्रत्येक वस्तू ठेवण्याचे विशेष नियम आहेत. वास्तूनुसार घराच्या प्रत्येक दिशेत स्वतःची ऊर्जा असते आणि या ठिकाणी ठेवलेल्या वस्तूंचा परिणाम हा घरातील सदस्यांवर होतो. वस्तू जर योग्य ठिकाणी ठेवली असेल तर त्याचा परिणाम सकारात्मक होतो याउलट जर ती वस्तू चूकीच्या ठिकाणी ठेवली असेेल तर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. काही गोष्टी घरात ठेवल्याने घरात शांती राहते, तर काही गोष्टी घरात अशांतता आणतात. घराच्या छतावर ठेवलेल्या काही गोष्टी तुमच्या प्रगतीत अडथळा आणतात.

घराच्या छतावर काही वस्तू ठेवल्याने घरात गरिबी येते. चला जाणून घेऊया घराच्या छतावर कोणत्या गोष्टी ठेवू नयेत आणि जर या गोष्टी तुमच्या घराच्या छतावर असतील तर लवकरात लवकर घराच्या छतावरून काढून टाका.

हे सुद्धा वाचा

घराच्या छतावरून या वस्तू काढून टाका

  • वास्तुशास्त्रानुसार घराच्या छतावर चुकूनही कचरा ठेवू नये. या गोष्टी छतावर ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे घराच्या छतावर
  • कोणताही कचरा किंवा जुनी खराब वस्तू ठेवली असेल तर ती घराबाहेर फेकून द्या.
  • घराच्या छतावर जुना कचरा ठेवला असेल तर तो लगेच बाहेर काढा. घरात रद्दी आणि जुने कागद ठेवणे आई लक्ष्मीला आवडत नाही. अशा परिस्थितीत तुमच्या घरात गरिबीही येऊ शकते. म्हणूनच जुनी कागदपत्रे किंवा मासिके गच्चीवर ठेवू नयेत.
  • घराच्या छतावर टाकाऊ झाडे, माती किंवा धूळ साचू देऊ नका. छतावर घाण साचू देऊ नका आणि नेहमी स्वच्छ ठेवा. वेळोवेळी छताची साफसफाई केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
  • घराच्या छतावर झाडू, गंजलेले लोखंड किंवा निरुपयोगी लाकडाचे तुकडे कधीही ठेवू नका. या वस्तू छतावर ठेवणे अशुभ मानले जाते. या गोष्टी छतावर ठेवल्याने घरात दारिद्र्य येते.
  • कपडे सुकवण्यासाठी छताला दोरी बांधली तर ते बांधल्यानंतर दोरीचा गठ्ठा कधीही छतावर ठेवू नका. वास्तूमध्ये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते.
  • जर दुर्दैव तुमचा पाठलाग करत नसेल किंवा तुमच्या आयुष्यात काही अघटित घडत असेल तर वास्तूनुसार घराचे छत नेहमी पाण्याने धुत रहा. छत नेहमी स्वच्छ ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)