Vastu Tips : तुम्हीसुद्धा जेवणानंतर ताटात हात धुता? जाणून घ्या त्याचा काय परिणाम होतो

| Updated on: Apr 16, 2023 | 4:02 PM

वास्तुशास्त्रानुसार अन्न खाताना हे लक्षात ठेवले पाहिजे की जेवढे खावेसे वाटते तेवढेच घ्या. घरी, विशेषतः लहान मुलांना ही सवय असते की ते ताटात जास्त अन्न घेतात आणि फारच कमी खातात, त्यामुळे अन्न वाया जाते.

Vastu Tips : तुम्हीसुद्धा जेवणानंतर ताटात हात धुता? जाणून घ्या त्याचा काय परिणाम होतो
थाळी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : भोजनाला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत अन्नाला देवता मानण्यात आले आहे. त्यामुळेच भोजनाचा सन्मान केला जातो. प्राचीन काळापासून आपल्याकडे ताटाखाली लाकडी पाट किंवा तिवई ठेवण्याची प्रथा आहे. ही प्रथा आजही ग्रामीण भागात सर्रास आढळते. यामागे अन्नदेवतेचा सन्मान (Food Vastu tips) करण्याची भावना असते. याशिवाय अनेक भागात जेवणानंतर ताटातील पाणी पिण्याचीही परंपरा आहे. यामागे अन्नाच्या प्रत्येक कणाला सन्मान देण्याचीच भावना आहे. भोजनापूर्वी हे अन्न ईश्वरस्वरूप आहे, अशा आशयाच्या प्रार्थना किंवा श्लोक म्हणण्याचीही पद्धत आहे.

वास्तुशास्त्रानुसार अन्न खाताना हे लक्षात ठेवले पाहिजे की जेवढे खावेसे वाटते तेवढेच घ्या. घरी, विशेषतः लहान मुलांना ही सवय असते की ते ताटात जास्त अन्न घेतात आणि फारच कमी खातात, त्यामुळे अन्न वाया जाते. शास्त्रात ते अजिबात योग्य मानले जात नाही. त्यामुळे घराच्या आर्थिक विकासात अडचण निर्माण होते. म्हणून, ही गोष्ट मुलांना आणि इतर सर्व लोकांना देखील समजावून सांगा की ताटात जेवढे खावे तेवढेच घ्या. यामुळे घरातील सर्व काही सुरळीत चालते.

वास्तूनुसार, रात्रीच्या वेळी खरकटी भांडी देखील घरात ठेवू नयेत. दुसरीकडे, काही लोकं जेवण केल्यानंतर टेबल आणि बेडच्या खाली किंवा वर कुठेही प्लेट ठेवतात, हे देखील अजिबात योग्य नाही. जेवल्यानंतर भांडी ताबडतोब सिंकमध्ये किंवा घरात जिथे जिथे भांडी धुत असतील तिथे ठेवावीत.

हे सुद्धा वाचा

याशिवाय लक्षात ठेवा की याशिवाय जेवणानंतर चुकूनही ताटात हात धुवू नये असे करणे स्वतःच संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे जेवणादरम्यान या सर्व छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही तुमचे जीवन आनंदी करू शकता. जेवताना काही खास गोष्टी लक्षात ठेवण्याबाबत वास्तुशास्त्रातील ही चर्चा होती. आशा आहे की या वास्तू टिप्सचा अवलंब केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)