मुंबई : हिंदू धर्मात पिंपळाचे झाड अतिशय पवित्र मानले जाते. पिंपळाच्या झाडात (Pimpal Tree) ब्रह्मा, विष्णू आणि भगवान शिव राहतात असे म्हणतात. या झाडाबाबत शास्त्रात अनेक नियम सांगण्यात आले आहेत. तसे, पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते, कारण सर्व देवी-देवता पिंपळाच्या झाडावर वास करतात. पण घरात पिंपळाचे झाड असणे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. पिंपळाचे झाड घरात वाढणे फारच अशुभ आहे. म्हणूनच पिंपळाचे झाड घरात वाढू देऊ नये आणि जर ते वाढले तर ते उपटून टाकावे. घराच्या छतावर किंवा भिंतीच्या साहाय्याने पिंपळाचे झाड अनेकदा उगवल्याचे आपण सर्वांनीच पाहिले असेल. मग अशा परिस्थितीत काय करावे हे लोकांना समजत नाही. जर तुमच्या घरातही पिंपळाचे झाड पुन्हा पुन्हा उगवत असेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. चला सविस्तर जाणून घेऊया की जर घरात पिंपळाचे झाड उगवले असेल तर ते कसे दूर करावे जेणेकरून वास्तुदोष होणार नाही.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)