मुंबई, वास्तुशास्त्रात (Vastu tips) घराचा मुख्य दरवाजा हा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. म्हणूनच मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवला पाहिजे. वास्तूशास्त्राच्या दृष्टीनेदेखील याला विशेष महत्व आहे. बऱ्याचदा वास्तूदोष दुर करण्यासाठी घराच्या मुख्य दारावर देवी देवतांचे फोटो लावण्याचा सल्ला देण्यात येतो, मात्र प्रत्येकच देवी देवतांचे फोटो घराच्या मुख्य दारावर लावणे योग्य मानले जात नाही. म्हणूनच वास्तूनुसार काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. धार्मिक मान्यतेनुसार गणपतीला पहिले पूजनीय देवता मानले जाते. गणेशाची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतात. परंतु अनेकजण आपल्या घराच्या मुख्य दारात बाहेरील आणि आतील बाजूस गणेशाची मूर्ती किंवा फोटो चिकटवतात पण वास्तुशास्त्रात याच्या उलट असल्याचे मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजावर बाहेर गणेशाची मुर्ती किंवा फोटो लावणे योग्य मानले जात नाही. मानले जात नाही. अनेक वेळा लोकांना असे वाटते की मुख्य दरवाजावर गणेशाची मूर्ती किंवा चित्र लावणे शुभ असते, परंतु वास्तुशास्त्रानुसार या दोन्ही स्थिती चुकीचे आणि अशुभ परिणाम देणारी मानली जातात. त्यामुळे ही चुक अवश्य टाळावी.
मुख्य दरवाजावर चुकूनही गणेशाची मूर्ती किंवा चित्र लावू नये. द्वारपालाची भूमिका घराच्या मुख्य दारात असल्याने बाप्पाचे चित्र किंवा मूर्ती ठेवणे हा त्यांचा अपमान समजला जातो. याशिवाय बाथरूम किंवा टॉयलेटला जोडल्या जाणाऱ्या भिंतीवर गणपतीचे चित्र कधीही लावू नये. यामुळे वास्तूदोष निर्माण होऊ शकतो. म्हणूनच गणपतीची पूजा घरात म्हणजेच देवघरात करावी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)