नळाच्या अति आणि चुकीच्या वापरामुळे ते खराब होतात आणि त्यातून सतत थोडे थोडे पाणी वाहत असते (leaking water in tab) . इतक्या छोट्याश्या गोष्टीकडे आपण फारसे लक्ष देत नाही, पण वास्तुशास्त्राच्या (Vastu shatra) मते यामुळे वास्तुदोष (Vastu Dosh) निर्माण होऊ शकतो. जर तुमच्या घरातही असे होत असेल तर ते नळ वेळीच दुरुस्त करा.नळातून गळणारं पाणी वास्तूच्या दृष्टीने अशुभ मानले जाते. त्याचा माणसाच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो. बाथरूममध्ये किंवा स्वयंपाकघरात बसवलेल्या नळांमधून थेंब थेंब पाणी गळत राहातं. आपल्यापैकी बहुतेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. पण वास्तूनुसार ही गोष्ट नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. विनाकारण पाण्याचा अपव्यय करणे शुभ मानले जात नाही. अशाप्रकारे पाण्याचा प्रवाह विनाकारण थेंब थेंब वाहून गेला तर घरातील अनावश्यक खर्च वाढतो, असं पूर्वीचे लोक म्हणायचे. म्हणूनच खरबा तुटका नळ लवकर दुरुस्त करावा. जेणेकरून पैसा पाण्यासारखा वाहून जाण्यापासून रोखता येईल.
स्वयंपाक घरातला नळ गळणे अशुभ मानले जाते. स्वयंपाक घरात अग्निदेवता असते. जेव्हा पाणी आणि अग्नि दोन्ही एकत्र येतात तेव्हा माणसाच्या आयुष्यात समस्या निर्माण होतात. स्वभावात उधळपट्टीची भावना निर्माण होते.
वास्तूशास्त्रानुसार नळातून पाणी गळणं किंवा टपकणं हे चांगलं नाही. त्यामुळे घरावर संकट ओढवू शकतं, व्यवसायात मोठा तोटा होऊ शकतो. आर्थिक वृद्धी मंदावतो आणि नुकसान होण्याचे हे संकेत असतात. त्यामुळे लावलरात लवकर तो नळ दुरुस्त करून घ्यावा.
वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्ट ठेवण्यासाठी योग्य दिशा आहे. तसेच पाण्याची टाकी ईशान्य दिशेला ठेवावी. असं केल्याने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक समृद्धी येते. त्याचबरोबर पाण्याची टाकी नैऋत्य दिशेला ठेवू नये. या दिशेला पाण्याची टाकी ठेवल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कर्जाची समस्या निर्माण होऊ शकते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)