Vastu Tips : या 5 पेंटिंग आहेत खूपच चमत्कारी; यातील एक जरी फोटो घरात असेल तर रंकाचाही बनतो कुबेर, नशीब घोड्यासारखं धावतं

| Updated on: Dec 16, 2024 | 8:37 PM

काही फोटो घरात लावणं हे वास्तु शास्त्रानुसार अशुभ मानलं जातं. तर काही फोटो हे अत्यंत शुभ मानले जातात. आज आपण अशाच काही फोटोंबद्दल माहिती घेणार आहोत

Vastu Tips : या 5 पेंटिंग आहेत खूपच चमत्कारी; यातील एक जरी फोटो घरात असेल तर रंकाचाही बनतो कुबेर, नशीब घोड्यासारखं धावतं
Follow us on

वास्तु शास्त्रामध्ये दिशा आणि स्थानाला खूप महत्त्व असते. वास्तु शास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या घरात एखादी वस्तू अथवा सामान चुकीच्या दिशेला ठेवलं तर त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.यामुळे तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. पैशांशी संबंधित समस्या तसेच गृहकलह देखील वाढतो.त्यामुळे तुमच्या घरातील प्रत्येक वस्तू ही वास्तु शास्त्रात सागिलेल्या पद्धतीने ठेवणं गरजेचं असतं.तुम्ही तुमच्या घरात सजावटीसाठी विविध फोटो देखील लावतात. मात्र यातील काही फोटो घरात लावणं हे वास्तु शास्त्रानुसार अशुभ मानलं जातं. तर काही फोटो हे अत्यंत शुभ मानले जातात. आज आपण अशाच काही फोटोंबद्दल माहिती घेणार आहोत, जे फोटो तुमच्या घरात लावणं अतिशय शुभं मानलं गेलं आहे.या फोटोंमुळे तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहाते असा दावा वास्तु शास्त्रामध्ये करण्यात आला आहे.

हंसाच्या जोडीचा फोटो

हंसाच्या जोडीकडे प्रेमाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं.जर तुम्ही हंसाच्या जोडीचा फोटो तुमच्या घरात लावला तर तुमच्या कुटुंबात देखील सुख समृद्धी येते. एकमेकांबद्दलचा द्वेष कमी होऊन प्रेम वाढतं. वास्तु शास्त्रानुसार हंसाच्या जोडीचा फोटो हा तुमच्या बेडरूममध्ये लावणे शुभ मानलं गेलं आहे.

धावत्या घोड्यांची पेंटिग

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की घरात धावत्या घोड्यांची पेंटिंग लावणं हे अत्यंत शुभ असतं. वास्तु शास्त्रानुसार तुम्ही जर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्यांची पेंटिग लावली तर तुमचे पैशांसंबंधित ज्या काही समस्या आहेत, कर्ज आहे, ते सर्व नष्ट होऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. तुमच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत राहातो.

उगवत्या सूर्याचं पेंटिंग

घरामध्ये उगवत्या सूर्याचं पेंटिंग असणं हे वास्तु शास्त्रात अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. उगवत्या सूर्याच्या पेंटिंगमुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. नेहमी सकारात्मक उर्ज राहाते. कुटुंब आनंदी राहातं.

वाहणाऱ्या नदीचा फोटो

वाहणार्‍या नदीचा फोटो घरात असणं हे अतिशय शुभ मानलं गेलं आहे. जर तुमच्या घरात वाहणाऱ्या नदीचा फोटो असेल तर घरात हसतं -खेळतं वातावरण राहातं. कधीही भांडण होत नाही. तसेच घरात येणाऱ्या पैशांचा ओघ कधीही कमी होत नाही.

भगवान श्रीकृष्णांचा फोटो

भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलाचा फोटो तुमच्या देवघरात किंवा दर्शनी भागात लावणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे.यामुळे अनेक समस्यांचं निराकारण होतं.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)