मुंबई, तुम्ही तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात अनेकवेळा पाहिलं असेल की, अचानक एखाद्या छोट्या गोष्टीवरून वादाची परिस्थिती निर्माण होते आणि बघता बघता त्याचं मोठ्या वादात रूपांतर होतं. यामुळे कुटुंबातील सुख-शांती तर बिघडतेच, पण कुटुंबातील सदस्यांमध्ये दुरावाही निर्माण होतो. पण असं का होतं, अचानक घराचं वातावरण का बिघडतं हे समजत नाही. कधी कधी आपल्या चुका घरगुती कलह किंवा वादाचे कारण बनतात तर कधी त्यामागे वास्तुदोष (Vastu tips) असतो. होय, वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील खराब वास्तूमुळे, सुखी संसारात संकटं घेऊन येतात. तथापि, काही उपाय आहेत ज्याचा आपण अवलंब करू शकतो.
कधीकधी मतभेद काही लोकांच्या आयुष्यात अडचणीचे मोठे कारणबनते. तुमच्याही कुटुंबात कायम वाद होत असतील किंवा मतभेदांमुळे घरातील शांतता भंग होत असेल तर एकदा तुरटीशी संबंधित हा उपाय अवश्य करा. ज्योतिषशास्त्रानुसार घरातील कलह दूर करण्यासाठी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात काचेच्या भांड्यात तुरटी ठेवा आणि दर मंगळवारी बदलत राहा. या उपायाने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. गृहकलह संपुष्टात येतात.
घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असल्यास ती दूर करण्यासाठी तुम्ही दररोज तुरटी पाण्यात मिसळून घर पुसून काढावे. वाईट नजर टाळण्यासाठी किंवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी, तुरटीचा तुकडा काळ्या कपड्यात बांधून दारात लटकवा. तुरटीचा हा उपाय केल्याने चमत्कारिक बदल होतात असे मानले जाते.
जर तुम्हाला रात्री झोपताना भयानक स्वप्ने येत असतील किंवा तुमच्या घरातील मूल रात्री अचानक जागे होत रडत आले तर यावर देखील तुरटीचा एक उपाय सांगण्यात आलेला आहे. असे मानले जाते की तुरटीचा तुकडा कापडात बांधून पलंगाखाली ठेवल्यास भीतीदायक स्वप्न पडणे थांबतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)