Vastu Tips : घरातल्या या दिशेला मानल्या जाते सर्वात शुभ, देवतांचा असतो वास, अशी घ्या काळजी

| Updated on: Mar 10, 2023 | 9:26 AM

वास्तू शास्त्रानुसार घराच्या या दिशा स्वच्छ ठेवल्यास घरात देवता वास करतात. यासोबतच कुटूंबीयांना शुभ परिणामही मिळतात.

Vastu Tips : घरातल्या या दिशेला मानल्या जाते सर्वात शुभ, देवतांचा असतो वास, अशी घ्या काळजी
वास्तूशास्त्र
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : वास्तुशास्त्रात (Vastu Tips) स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. असे म्हणतात की ज्या घरांमध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते तेथे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि माता लक्ष्मी देखील स्वतः वास करते. वास्तूमध्ये घराचे असे काही कोपरे आणि सांगण्यात आले आहेत, जे स्वच्छ ठेवल्यास घराच्या या दिशांना देव वास करतात. वास्तू शास्त्रानुसार घराच्या या दिशा स्वच्छ ठेवल्यास घरात देवता वास करतात. यासोबतच कुटूंबीयांना शुभ परिणामही मिळतात. शास्त्रात सांगितले आहे की माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते आणि ज्या घरात या गोष्टींची काळजी घेतली जाते त्या घरात त्यांचा वास असतो.

उत्तर पूर्व

वास्तू तज्ञ सांगतात की घराचा किंवा ऑफिसचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवा. वास्तूमध्ये हे घराचे मुख्य स्थान मानले जाते. घराच्या ईशान्य कोपर्‍यात देवाचा वास असतो असे म्हणतात. घराचा हा भाग स्वच्छ ठेवल्यास घरातील सदस्यांची प्रगती होते.

ब्रह्म स्थान

ब्रह्म स्थान देखील घरातील मुख्य स्थान मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरातील ब्रह्म स्थान स्वच्छ ठेवल्यास घरातील सदस्यांसाठी ते खूप फायदेशीर मानले जाते. असे म्हटले जाते की घराच्या या ठिकाणी जड जागा किंवा कोणतीही निरुपयोगी वस्तू ठेवू नये.

हे सुद्धा वाचा

पूर्व दिशा

ज्योतिष आणि वास्तू या दोन्हीनुसार घराची पूर्व दिशा शुभ मानली जाते. घराची पूर्व दिशा स्वच्छ ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. यासोबतच घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो आणि माता लक्ष्मीही खूप प्रसन्न होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)