मुंबई : फुलांचा भारताच्या संस्कृतीशी खूप जुना संबंध आहे. पूजेपासून कवींच्या कवितांपर्यंत सर्वत्र फुलांचा उल्लेख होतो. रागावलेल्या मैत्रिणीच्या गालावर हसू फुलवण्यापासून ते ते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक बाबतीत फुलं ही महत्वाचा दुवा असतात. ही फुले घरातील अनेक वास्तू दोष दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात. वास्तुशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते फुलांशी संबंधीत असे काही उपाय आहेत ज्यामुळे आर्थिक परिस्थिती झपाट्याने सुधारू शकते. फुलांचा वापर करण्यापूर्वी त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वाचे नियम समजून घ्या.
वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की घरात लाल जास्वंदाच्या फूलाचे झाड लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा सर्वत्र संचारते. जास्वंदाचे फूल आई भवानी आणि गणेशाला खूप प्रिय आहे. घरामध्ये जास्वंदाचे झाड लावताना लक्षात ठेवा की ते नेहमी उत्तर दिशेला लावावे.
हिंदू धर्मात अनेक देवी-देवतांना कमळाचे फूल धरलेले दाखवले आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघेही कमळाचे फूल धारण करतात, तर माता सरस्वती आणि भगवान ब्रह्मदेवाचे आसन केवळ कमळाचे फूल आहे. घरामध्ये कमळाच्या फुलाचे रोप लावल्याने घरामध्ये आर्थिक समृद्धी येते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.
प्रेमात पडलेले लोकं अनेकदा गुलाबाच्या फुलांनी आपले प्रेम व्यक्त करतात. पूजेतही गुलाबाच्या फुलांचा वापर केला जातो. नैऋत्य दिशेला गुलाबाचे फूल लावल्याने घरात सुख-समृद्धी राहते. याशिवाय गुलाब घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो.
जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली नसेल, तर त्याने पळसाच्या फुलाचा विशेष उपाय करावा, असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. पळसाचं फूल व नारळ पांढऱ्या कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैसे असलेल्या ठिकाणी ठेवावं. असं केल्यानं तुमचं आर्थिक संकट लवकरच दूर होईल. हा एक उपाय केल्याने घरात धनाची कमतरता भासणार नाही. पळसाची ताजी फुलं न मिळाल्यास त्याची वाळलेली फुलंही वापरता येतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)