मुंबई : वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) मोराचे पंख अत्यंत शुभ मानले जातात. बरेच जण ते घरी ठेवतात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते व मन प्रसन्न राहते. हिंदू मान्यतेनुसार, श्रीकृष्णाने डोक्यावर मोराची पिसे धारण केली होती, त्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढते. भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात मोरपंख अर्पण केल्याने जीवनात यश मिळते, अशी धार्मीक मान्यता आहे.
घराच्या कोणत्याही कोपऱ्यात मोराची पिसे ठेवणे शुभ मानले जात असले तरी घराच्या आग्नेय दिशेला मोराची पिसे ठेवल्याने नेहमी आशीर्वाद मिळतात.
जर घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रानुसार बांधला नसेल तर त्यावर तीन मोराची पिसे लावावीत आणि खाली गणपतीचे चित्र लावावे. याने वास्तुदोष संपतो.
वैवाहिक जीवनातील भांडणे थांबण्याचे नाव घेत नसतील तर तुम्ही हे उपाय करू शकता. घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बेडरूममध्ये मोराची पिसे ठेवा. यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम राहील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)