Vastushastra: संध्याकाळच्या वेळी केलेल्या ‘या’ पाच गोष्टींमुळे घरात येते दारिद्र्य, काय सांगतात वास्तुशास्त्रातील नियम?

| Updated on: Dec 08, 2022 | 12:40 PM

वस्तूशास्त्रातला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार संध्याकाळी काही गोष्टी टाळण्याचे सांगितले आहे.

Vastushastra: संध्याकाळच्या वेळी केलेल्या या पाच गोष्टींमुळे घरात येते दारिद्र्य, काय सांगतात वास्तुशास्त्रातील नियम?
वास्तू दोष
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी वास्तूच्या (Vastushastra) तत्त्वांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. घराच्या बांधकामात किंवा देखभालीमध्ये वास्तूच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास कुटुंबातील सदस्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागते. असं म्हणतात की संध्याकाळी काही विशेष काम केल्यानेही वास्तुदोष (Vastudosh) निर्माण होतात. संध्याकाळच्या वेळी या चुका केल्याने घराच्या आर्थिक समृद्धीवर खूप वाईट परिणाम होतो. जाणून घेऊया वास्तुशास्त्रात सूर्यास्तानंतर कोणती कामे न करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.

  1. उधार पैसे देऊ नये- वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी पैशाचे व्यवहार कधीही करू नयेत. सूर्यास्तानंतर कोणालाही कर्ज देऊ नका आणि कोणाकडून कर्ज घेऊ नका. असं म्हणतात की, सूर्यास्तानंतर तुम्ही एखाद्याला कर्ज दिले तर ते परत मिळविण्यासाठी समस्या निर्माण होते. या वेळेत घेतलेल्या कर्जाचे ओझेही कधीच उतरत नाही.
  2. तुळशीची पाने तोडू नये- तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते असे म्हणतात, त्यामुळे संध्याकाळी चुकूनही तुळशीची पाने तोडू नये. असे केल्याने भगवान विष्णू नाराज होतात. तुळशीची पाने संध्याकाळच्या वेळी तोडल्यास रोग आणि आर्थिक समस्या यांसारख्या समस्या व्यक्तीला घेरतात. संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा.
  3. झाडू नका- वास्तुशास्त्रानुसार चुकूनही सूर्यास्तानंतर घर झाडू नये. संध्याकाळी घर झालंडल्याने  माता लक्ष्मी घरात प्रवेश करीत नाही, ज्यामुळे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. काही कारणास्तव घर झाडून घ्यावं लागत असेल तर त्यातून जमा झालेला कचरा घराबाहेर टाकू नका. एका बाजूला गोळा करा आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरच घराबाहेर काढा.
  4. मुख्य दरवाजा बंद ठेवू नका- संध्याकाळी घराचा मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवा. असे म्हणतात की सूर्यास्तानंतर घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवू नये. धार्मिक मान्यतेनुसार याच वेळी देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते. त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा जर संध्याकाळी बंद असेल तर देवी लक्ष्मी घरात प्रवेश करीत नाही.
  5. भांडू नये- वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर घरात कधीही भांडण किंवा वादावादी करू नये. यामुळे लक्ष्मी देवी कोपते आणि घराभोवती दारिद्र्य येऊ लागते. जर एखादा गरीब माणूस संध्याकाळी तुमच्या दारात आला तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तुमच्या क्षमतेनुसार अशा लोकांना काहीतरी द्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)