मुंबई : सनातन धर्मात विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला वट सावित्री व्रत (Vat Savitri 2023) पाळतात. या दिवशी, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी, दिवसभर निर्जल उपवास केला जातो. असे म्हटले जाते की, हे व्रत पवित्रतेचे प्रतीक आहे आणि यामुळे पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येतो. या वर्षी वट सावित्री व्रत कधी साजरी होणार आहे ते जाणून घेऊया.
यावर्षी वट सावित्री व्रत 3 जुन 2023 रोजी होणार आहे. पंजाब, दिल्ली, ओडिशा, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये वट सावित्री व्रत या 19 मे म्हणजेच अमावस्येला पाळले जाते. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या वेळी 3 जून रोजी येणाऱ्या ज्येष्ठ पौर्णिमेला हे व्रत केले जाणार आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी वट सावित्री व्रताचा शुभ मुहूर्त 3 जुन 2023 रोजी सकाळी 11.17 मी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.11 पर्यंत असेल. तथापि, उदयतिथीनुसार हे व्रत 3 जुन रोजीच पाळणे योग्य ठरेल.
वटवृक्षाच्या खोडात विष्णु, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत. वडाच्या झाडाच्या बऱ्याच फाद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं. मनातील इच्छा पूर्ण होतात. संतान प्राप्ती साठी देखील अनेक स्त्रियां वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाचे आयुष्य हे लांब असते. ज्येष्ठ महिन्यातील अमावस तिथीला वट वृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुर्नजीवन मिळवून दिले होते. यादिवसापासून वट वृक्षाची पूजा केली जाऊ लागली. पिंपळाच्या झाडाला विष्णु देवाचे प्रतीक मानले जाते. तसंच वटवृक्षाला शिव शंकराचं प्रतीक मानलं जातं. यावृक्षाची पूजा करणं शंकराची पूजा करण्यासारखं आहे.