मुंबई : दर महिन्याला विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी येते. आज विनायक चतुर्थी आहे (Vinayak Chaturthi 2021 Upay). आजच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा केली जाते. आजच्या दिवशी विघ्नहर्ताची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात. या दिवशी लोक उपवास करतात. भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी घरात विधीवत पूजा करतात. यावेळी चतुर्थी बुधवारी आली आहे. बुधवारचा दिवस भगवान गणेशाला (Ganesh) समर्पित असतो. त्यामुळे याचं महत्त्व आणखी वाढतं (Vinayak Chaturthi 2021 Upay For Happiness And Prosperity).
विनायक चतुर्थीच्या दिवशी भाविक उपवास ठेवतात. गणेशाला पंचामृत, चंदन, लाल पुष्प, कुमकुम, मोदक आणि दुर्वा चढवला जातो. आजच्या दिवशी जी व्यक्ती श्रद्धा भावाने पूजा करतात. याने जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी खास उपया केल्याने शुभ फळाची प्राप्ती होती. चला जाणून घेऊ या उपायांबाबत –
1. जीवनात मानसिक समस्यांपासून दूर राहण्यासाठी विनायक चतुर्थीला शतावरी अर्पित करा. त्यामुळे तुम्हाला मन:शांती लाभेल.
2. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाला झेंडूचं फुल अर्पित करा. यामुळे घरातील क्लेश दूर होतात.
3. जर घरात पैशांबाबत वादविवाद सुरु असले तर बाप्पाला चौकोर चांदीचा टुकडा अर्पण करा. यामुळे घरात पैशांचा वाद मिटेल.
4. जर कुठल्या व्यक्तीच्या जीवनात प्रेम संबंधांबाबत समस्या असतील तर गणेशाला 5 वेलची आणि 5 लवंग अर्पित करा.
5. जीवनात आर्थिक प्रगती हवीये तर गणेशाला 8 मुखी रुद्राक्ष अर्पित करा.
विनायक चतुर्थीची तिथी 16 मार्च रात्री 08:58 पासून ते 17 मार्च सकाळी 11: 28 ला समाप्त होईल. पूजेचा शुभ मुहूर्त 17 मार्चला 11 वाजून 47 मिनिट ते दुपारी 1 वाजून 42 मिनिटांपर्यंत असेल.
हिंदू धर्मात सर्वात पहिली पूजा भगवान गणेशाची केली जाते. कुठल्याही शुभ कार्य करण्यापूर्वी पहिले गणेशजीची पूजा केली जाते. भगवान गणेशाला विघ्नहर्ता मानलं जातं. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात (Vinayak Chaturthi 2021 Upay For Happiness And Prosperity In Life).
सकाळी सूर्योदयावेळी उठून मनाच देवाच्या नावाचं स्मरण करत उपवासाचा संकल्प करा. स्नान केल्यानंतर भगवान गणेशाला गंगा जलने स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर मंदिरात धूप, दीप प्रज्वलित करा. रोळी किंवा शेंदूरने तिलक करा. अक्षता, पुष्प, दुर्वा, लाडू किंवा मोदक भगवान गणेशाला अर्पित करा. विनायक चतुर्थीची व्रत कथा वाचा आणि आरती करा.
Vinayak Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या…https://t.co/4rHxJ3vkXl#VinayakChaturthi #LordGanesha
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 17, 2021
Vinayak Chaturthi 2021 Upay For Happiness And Prosperity
संबंधित बातम्या :
घरात असेल ‘शाळीग्राम’ तर ‘हे’ नियम कटाक्षाने पाळा, अन्यथा विपरित परिणाम होऊ शकतात
शंख वाजवण्याचं महत्त्व काय? शंखाची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचे फायदे काय?, जाणून घ्या…