मुंबई : हिंदू कॅलेंडरनुसार, विनायक चतुर्थी दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरी केली जाते. हा दिवस गणपतीला समर्पित आहे आणि या दिवशी गणपतीची पूजा केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. दुसरीकडे, श्रावण महिना सुरू असून, शुक्रवार, 21 जुलै रोजी श्रावणाची पहिली विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) येत आहे. अशा स्थितीत उपवास आणि विधिवत पूजा केल्याचे फळ भाविकांना मिळू शकते. गणपतीला कोणता नैवेद्य आवडतो? लक्ष्मी सोबत तिची पूजा का केली जाते? अशा सर्व गोष्टी गणेश भक्तांना माहित असणे आवश्यक आहे. पण तुम्हाला गणपतीच्या दोन लग्नांबद्दल माहिती आहे का? त्याबद्दल जाणून घेऊया.
पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान गणेश तपश्चर्येत मग्न ध्यानस्थ बसले होते. गणपतीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवताना तुळशीने ध्यान मोडले. हे पाहून गणपतीला राग आला आणि त्यांनी स्वतःला ब्रह्मचारी म्हणवून तुलसीचा विवाहाचा प्रस्ताव नाकारला. गणपतीचे न ऐकल्याने तुळशीलाही राग आला आणि तिने गणपतीला दोन लग्नांचा शाप दिला.
पौराणिक कथेनुसार, गणपतीच्या चेहऱ्यामुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करण्यास तयार नव्हते. त्यामुळे गणपतीला राग आला आणि त्यांनी इतर देवी-देवतांच्या विवाहात अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली. या समस्येबद्दल सर्व देव ब्रह्माजींकडे पोहोचले. तेव्हा ब्रह्माजींनी आपल्या योगसामर्थ्याने रिद्धी आणि सिद्धी या दोन मानस मुलींना जन्म दिला. ब्रह्माजींच्या सांगण्यावरून रिद्धी आणि सिद्धी यांनी गणेशाला शिक्षण देण्यास सुरुवात केली.
अशा स्थितीत जेव्हा कधी कुणाच्या लग्नाची बातमी गणपतीला यायची तेव्हा रिद्धी-सिद्धी गणपतीचं लक्ष विचलीत करायची. अशाप्रकारे देवतांचे विवाह यशस्वीपणे संपन्न होऊ लागले. पण त्यामुळे गणपतीचा राग वाढू लागला. म्हणूनच एके दिवशी ब्रह्माजींनी गणेशासमोर रिद्धी-सिद्धीला लग्नाचा प्रस्ताव ठेवला. गणेशजींनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि अशा प्रकारे गणेशजींचा रिद्धी आणि सिद्धीसोबत विवाह झाला.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)