Vinayak Chaturthi : कधी आहे विनायक चतुर्थी? या चार शुभ योगात होणार बाप्पाची पुजा

| Updated on: Feb 21, 2023 | 2:16 PM

यावेळी विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत. या दिवसापासून, शुभ योग पहाटेपासूनच सुरू होईल, जो रात्री 8.58 पर्यंत राहील.

Vinayak Chaturthi : कधी आहे विनायक चतुर्थी? या चार शुभ योगात होणार बाप्पाची पुजा
चतुर्थी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील दोन्ही चतुर्थी तिथी गणेशाला समर्पित केली जातात. शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) म्हणतात. या दिवशी गणेशाची आराधना करणे विशेष फलदायी असते.या दिवशी गणपतीची विशेष पूजा करतात. गणपतीचं दुसरं नाव विघ्नहर्ता आहे. तसेच, आज केलेल्या व्रतामुळे धनलाभही होतो, असे मानले जाते. यावेळी विनायक चतुर्थीच्या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत. त्यामुळे यावेळी विनायक चतुर्थीला खूप महत्त्व आले आहे.

शुभ सुरुवात

फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 23 फेब्रुवारीला पहाटे 3:24 वाजता सुरू होईल आणि 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:33 वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत 23 फेब्रुवारी रोजी उदय तिथीला विनायक चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवशीच्या पूजेच्या शुभ मुहूर्ताबद्दल सांगायचे तर तो सकाळी 11.32 ते दुपारी 01.49 पर्यंत आहे.

शुभ योग

यावेळी विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत. या दिवसापासून, शुभ योग पहाटेपासूनच सुरू होईल, जो रात्री 8.58 पर्यंत राहील. यानंतर शुक्ल योग सुरू होईल, जो रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत राहील. त्याचबरोबर विनायक चतुर्थीच्या दिवसभर रवि योग राहील.

हे सुद्धा वाचा

विनायक चतुर्थीला करावयाचे हे उपाय

  1. विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी पूजा करताना शुभ मुहूर्तावर श्रीगणेशाला शेंदुर वाहावे. शेंदुर वाहतांना “सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्। शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्॥“ या मंत्रांचे पठण करा.
  2. गणेशपूजेच्या वेळी गणेशाला झेंडूच्या फुलांचा हार घालावा. पूजा संपल्यानंतर तो काढून घराच्या मुख्य दारावर लावा.
  3. व्रताच्या दिवशी गणेशाला हिरवे वस्त्र अर्पण करावे. प्रत्येकी 5 लवंगा आणि वेलची गणपती पुढे ढेवावे प्रेम जीवनातील समस्या दूर होतील आणि प्रेम वाढेल.
  4. विनायक चतुर्थीला गणपतीला 5 किंवा 21 दुर्वा जोडी अर्पण करा.
  5. पूजेत मोदकाचा नैवेद्य दाखवा. सर्व कामात यश मिळेल.
  6. हा मंत्र -वक्रतुंडा महाकाया, सूर्यकोटी समप्रभा:। हे देवा, माझ्या सर्व कार्यात मला नेहमी अडथळ्यांपासून मुक्त कर. या मंत्राचा जप करा प्रत्येक कार्य सफल होईल. अडथळे दूर होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)