मुंबई, चैत्र महिन्यातील विनायक चतुर्थी व्रत आज, शनिवार, 25 मार्च रोजी पाळण्यात येत आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार हिंदू धर्मातील कोणतेही शुभ कार्य गणेश पुजनाशिवाय पूर्ण होत नाही. यामुळेच श्रीगणेशाला प्रसन्न ठेवण्यासाठी सनातन धर्मात दर महिन्याला विनायक चतुर्थी (Vinayaki Chaturthi March 2023) व्रत पाळली जाते. गणपतीची आराधना करणाऱ्या भक्तापासून संकटे कोसो दूर राहातात. या दिवशी केलेले काही उपाय अत्यंत फायदेशीर ठरतात.
चैत्र, शुक्ल चतुर्थी
सुरू होते – 24 मार्च, 04:59 pm
समाप्ती – 25 मार्च, 04:23 PM
गणपतीच्या पूजेची वेळ – सकाळी 11.13 ते दुपारी 1.40 पर्यंत
विनायक चतुर्थीच्या निमित्ताने आज रवियोग, विजय मुहूर्त आणि निशिता मुहूर्त असे अनेक शुभ योग तयार होत आहेत. आज सकाळी 6.19 पासून रवियोग सुरू झाला असून तो दुपारी 1.19 पर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी 2.29 पासून सुरू होईल आणि 3.18 पर्यंत चालेल. दुसरीकडे, निशिता मुहूर्त 26 मार्च रोजी सकाळी 12.03 ते 26 मार्च रोजी पहाटे 12.50 पर्यंत असेल.
विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यानंतर गणेशाची आराधना सुरू करा. या दिवसाच्या पूजेत नारळ आणि मोदक यांचा समावेश करावा. याशिवाय पूजेत गणेशाला गुलाबाचे फूल आणि दूर्वा अर्पण करा. धूप, दिवा, नैवेद्य अर्पण केल्यानंतर ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करावा. गणपतीची कथा वाचा, आरती करा, पूजेत सहभागी असलेल्या सर्वांना प्रसाद वाटप करा.
जीवनातील कोणत्याही प्रकारचे संकट दूर करण्यासाठी श्रीगणेशासमोर गोल दिवा लावा. याशिवाय तुमच्या वयाच्या आकड्यानुसार पुजेत लाडूचा नैवेद्य अर्पण करा. पूजा केल्यानंतर एक लाडू स्वतः खा आणि बाकीचे इतरांना वाटून घ्या. याशिवाय भगवान सूर्यनारायणाच्या सूर्यअष्टकाचा 3 वेळा पठण करा.
या दिवसाच्या पूजेमध्ये गणेशाला दुर्वा माळा अर्पण करा. त्यांना तूप आणि गूळ अर्पण करा. पैसे मिळावे म्हणून प्रार्थना करा. पूजेनंतर हे तूप आणि गूळ गायीला खाऊ घाला. हे पाच विनायक चतुर्थीच्या दिवशी करायचे आहे.
आपल्या मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी या दिवसाच्या पूजेत गणपतीला पाच मोदक, पाच लाल गुलाब आणि दूर्वा अर्पण करा. शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा. या पूजेनंतर एक मोदक तुमच्या मुलाला प्रसाद म्हणून खायला द्या आणि उरलेले मोदक इतर मुलांना किंवा गरजूंना वाटून द्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)