अंगाला भस्म, भरगच्च जटा अन् डोक्यावर कबूतर… कुंभमेळ्यात आयआयटी बाबानंतर आता कबूतरवाले बाबा

| Updated on: Jan 16, 2025 | 3:58 PM

प्रयागराज कुंभमेळ्यात कबुतरवाले बाबा प्रचंड चर्चेत आहेत. ते आपल्या डोक्यावर कबूतर घेऊन फिरतात आणि प्राण्यांची सेवा हा सर्वात मोठा धर्म असल्याचे सांगतात. गोसेवा आणि प्राण्यांवरील प्रेम हे त्यांच्या आध्यात्मिकतेचे केंद्र आहे. त्यांची जीवनशैली अनेकांना प्रेरणादायी वाटते.

अंगाला भस्म, भरगच्च जटा अन् डोक्यावर कबूतर... कुंभमेळ्यात आयआयटी बाबानंतर आता कबूतरवाले बाबा
Follow us on

प्रयागराजमध्ये सध्या जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव सुरू आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. देशभरातील साधू संत या महाकुंभात आले आहेत. एक आयआयटीयन बाबाही या महाकुंभात आला आहे. हा बाबा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. सोशल मीडियावर हा बाबा ट्रेंड होतोय. आता त्यापाठोपाठ आणखी एका बाबाची चर्चा सुरू झाली आहे. कबुतर वाले बाबा असं या बाबाचं नाव आहे. जुन्या आखाड्यातील हा बाबा आहे. त्यांचं मूळ नाव बाबा पावूराम आहे. पण त्यांना लोक प्रेमाने कबूतरवाले बाबा म्हणतात. त्याचंही एक कारण आहे. हा बाबा सध्या लोकांच्या चर्चेचा विषय झाला आहे. त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक लांबून लांबून येत आहेत.

बाबा पावूराम हे राजस्थानच्या चितौडगडचे रहिवासी आहेत. बाबा पावूराम गेल्या 9 वर्षापासून आपल्या डोक्यावर एक कबूतर घेऊन फिरत आहे. त्यामुळे या बाबाला कबूतरवाले बाबा म्हटलं जात आहे. प्राण्यांची सेवा करणं हा सर्वात मोठा धर्म आहे, असं कबूतरवाले बाबा सांगतात. प्रत्येक प्राण्यात देवाचं वास्तव्य आहे. त्यांना सन्मान आणि प्रेमाने पाहिलं पाहिजे. गोसेवा, गोरू सेवा आणि नंदी सेवा सर्वात महत्त्वाची सेवा आहे. ही सेवा तंत्रमंत्र आणि इतर साधनेपेक्षाही अधिक फलदायी असते. जे लोक प्राण्यांची सेवा करतात, त्यांना अद्भूत आध्यात्मिक लाभ मिळतो, असं या बाबाचं म्हणणं आहे.

तंत्रमंत्रापेक्षाही…

हे सुद्धा वाचा

बाबा पावूराम डोक्यावर कबूतर घेऊन फिरतात. प्राण्यांबाबतचं अतिव प्रेम आणि करूणेचं हे प्रतिक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. कुंभमेळ्यात आलेल्या प्रवाशांमध्येही बाबा आणि त्यांच्या कबूतराबाबतचं कुतूहूल आहे. लोक बाबांना त्यांची जीवनशैली आणि त्याच्यां विशेष प्रतिकाबाबत विचारत आहेत. हाच माझा संदेश आहे असं बाबा सांगत आहे. माझ्या डोक्यावर कबूतर आहे, याचा अर्थ प्राण्यांचा सन्मान करा. त्यांची सेवा करा, असं बाबा म्हणतात.

भगवान शंकराचा वास

प्राण्यांमध्ये भगवान शंकराचा वास आहे. तंत्रमंत्रापेक्षाही प्राण्यांची सेवा सर्वश्रेष्ठ आहे. लोकांनी गोसेवा करावी. जीवजंतूंचं रक्षण करावं. त्यांच्या प्रती करूणा ठेवावी, असं बाबा सांगतात. अंगाला भस्म, भरगच्च जटा आणि डोक्यावर कबूतर… बाबाचा हा वेष पाहून सर्वांनाच त्यांचं कुतूहूल वाटत आहे. तसेच त्यांच्याबद्दलची उत्सुकताही वाटत आहे. त्यांच्याकडून आध्यात्मिक प्रेरणाही घेत आहेत.