महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे (Ashadhi Ekadashi) महत्त्व अतिशय वेगळे आहे. विठ्ठलाच्या (Vitthal) भेटीची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात दाखल होतात. राज्यातील विविध भागांतून लाखों वारकरी पायी पंढरपूरला (Pandharpur) जातात. संत ज्ञानेश्वरांपासून ते जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला मार्गस्थ होतात. विठुनामाच्या गजरात तहान-भूक हरपून वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात.यावर्षीची विठ्ठल नामाच्या जयघोषात आदिशक्ती मुक्ताबाई (Muktabai) ची पालखी पंढरपूरला निघाली आहे. तब्बल कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर मुक्ताईचा पालखी सोहळा वारकऱ्यां सह पैदल पंढरपूर कडे निघाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथील संत मुक्ताई पालखीचं राज्याच्या अध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायात मोठं मानाचं स्थान आहे राज्यभरातून पंढरपूर कडे जाणाऱ्या विविध पालख्यांपेक्षा जळगाव जिल्ह्यातील ही पालखी सर्वात आधी निघते तशी ती पंढरपूर येथे ही पहिल्यांदा पोहचते. या आगमन प्रसंगी या पालखीचं मोठ्या जल्लोषात आणि भक्ती भावाने स्वागत केले जाते.
आज सकाळी मुक्ताई मंदिरात मूर्तीची विधिवत पूजा,काकड आरती,महाप्रसाद करून पूजन करण्यात आले आहे.वारकऱ्यांची आज पंढरपूरला जाण्यासाठी सकाळपासूनच धामधूम सुरू होती. मुक्ताई मंदिर विश्वास्थांनकडून आज विधीपूर्वक पूजा आरती करुन पंढरपूरला पालखी रवाना करण्यात आली. मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वच राजकीय नेते मंडळींची सोहळ्याप्रसंगी उपस्थिती होते.मुक्ताईनगरात आज सकाळपासूनच परिसरा भक्तिमय वातावरणाने गजबजून गेला होता. वारकऱ्यांची सर्वात लांब पल्ला असलेली मुक्ताईनगर ते पंढरपूर पालखी प्रवास सातशे किलोमीटर असलेली ही वारकऱ्यांची पालखी असते. पालखी सोहळ्यात महाराष्ट्र-मध्यप्रदेश विदर्भातील सर्व स्तरातून वारकरी उपस्थित होते.