ज्योतिषशास्त्र आणि वास्तू यांच्यानुसार रंगांशी आपल्या सर्वांचे वेगळेच नाते आहे. प्रत्येक रंगाचा आपल्या मनाशी आणि शरीराशी खोल संबंध असतो. शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी रंगाचे योग्य संतुलन राखणे फार महत्वाचे आहे. अशातच ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे वेगवेगळे रंग असतात ज्याच्या परिणाम तुमच्या जीवनावर होत असतो.
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात रंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच वेद आणि शास्त्रांमध्ये प्रत्येक दिवसासाठी विशिष्ट रंग सांगितले आहेत. हे रंग केवळ आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरच परिणाम करत नाहीत, तर ते आपल्या ग्रहांशी आणि त्यांच्या प्रभावांशी देखील संबंधित आहेत. शास्त्रानुसार आठवड्यातील प्रत्येक सात दिवस वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. जाणून घेऊया कोणत्या दिवशी कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करावा.
सोमवार – सोमवार हा वार चंद्र ग्रहाशी संबंधित आहे. या दिवशी पांढरे कपडे परिधान केल्याने मानसिक शांती मिळते. चंद्र हा मन आणि भावनांशी जोडलेला ग्रह असून पांढरा रंगाचे कपडे परिधान केल्याने या ग्रहाचा सकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडतो. याव्यतिरिक्त, पांढरे कपडे परिधान केल्याने व्यक्तीच्या आंतरिक ऊर्जेचा समतोल राखण्यास मदत होते.
मंगळवार – मंगळवार हा दिवस भगवान हनुमान आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीची मानसिक स्थिती तर मजबूत होतेच, शिवाय हनुमानाची कृपाही प्राप्त होते. लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने आत्मविश्वास आणि धैर्य वाढते आणि व्यक्ती कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्यास तयार राहते.
बुधवार – बुधवार हा वार गणपती देवाशी आणि बुध ग्रहाशी संबंधित आहे. बुधवारी या दिवशी हिरवे कपडे परिधान केल्याने वाणी, बुद्धिमत्ता आणि संप्रेषणाशी संबंधित असलेल्या बुध ग्रहाचा आशीर्वाद प्राप्त होतो. हिरवे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे बोलणे गोड आणि प्रभावी होते, ज्यामुळे व्यावसायिक जीवनात यश मिळते. हा रंग मानसिक स्पष्टता आणि ताजेपणाचे प्रतीक आहे.
गुरुवार – गुरुवार हा दिवस सर्व ग्रहांचे गुरु मानल्या जाणाऱ्या गुरु बृहस्पतीशी संबंधित आहेत. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या गुरू ग्रहाची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. पिवळे कपडे परिधान केल्याने जीवनात मानसिक शांती आणि आनंद मिळतो.
शुक्रवार – शुक्रवारचा दिवस लक्ष्मी देवी तसेच आई दुर्गेचा आणि शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. या दिवशी लाल आणि पांढरे कपडे परिधान केल्याने धन आणि समृद्धी येते. लाल रंग लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते, तर पांढरा रंग परिधान केल्याने मानसिक शांती आणि सौम्यता येते.
शनिवार – शनिवारी गडद किंवा काळे कपडे परिधान केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते. हा रंग व्यक्तीला न्याय आणि समतोल राखण्यास मदत करतो. तथापि काळ्या रंगाचा अतिवापर टाळला पाहिजे आणि गडद छटा निवडल्या पाहिजेत. यामुळे राहू आणि केतूच्या प्रभावापासूनही संरक्षण होते.
रविवार – रविवार हा दिवस सूर्यदेवाशी संबंधित आहे आणि या दिवशी लाल किंवा गडद रंगाचे कपडे परिधान केल्याने सूर्य ग्रहाचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात यश आणि सन्मान प्राप्त होतो. लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्येक प्रयत्नात यश मिळण्यास मदत होते.
त्यामुळे आठवड्याच्या प्रत्येक दिवसासाठी ठरलेल्या रंगांचे पालन केल्याने जीवनात शांती, सुख आणि समृद्धी येते. हे रंग केवळ तुमच्या बाह्य स्वरूपावरच परिणाम करत नाहीत तर तुमच्या अंतर्गत ऊर्जेचा समतोल राखण्यास देखील मदत करतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)