अशा अनेक मान्यता आहेत, ज्या बरेज लोक फॉलो करतात. पण, त्या का फॉलो करतात हे त्यांना माहिती नसतं. त्यामागची कारणं त्यांना माहिती नसतात. कोणत्याही अशा प्रथा, पद्धती फॉलो करण्याआधी त्यामागची वैज्ञानिक कारणं (Scientific Reasons) जाणून घेणं गरजेचं आहे. माहिती करून घेऊया हिच कारणं काय आहेत.
अनेकदा घरातील वयाने मोठे असलेले लोक अशा काही गोष्टी करत असतात, ज्या मागे नेमकं लॉजिक काय आहे हेच आपल्याला लक्षात येत नाही. घरातील मोठे करतात त्यामुळे अनेकजण डोळे झाकुन अशा प्रथा, पद्धती फॉलो करतात. अशा अनेक पद्धती बरेच जण त्यांना कोणीतरी सांगितलं आहे म्हणून फॉलो करतात. ऐकलेल्या गोष्टी फॉलो करणं अंधश्रद्धा आहेत. तुम्ही अनेक लोकांना घराच्या दाराबाहेर, दुकाना बाहेर लिंबू मिर्ची लटकवलेलं पाहिलं असेल.असं केल्याने वाईट नजरे पासून रक्षण होतं असं मानलं जातं. पण, यामागे असेलेलं खरं तथ्य काहीतरी वेगळंच आहे. लिंबात सॅट्रीक एसिड (Citric Acid in Lemon) असतं आणि मिर्ची तिखट असते. हे जेव्हा दाराबाहेर टांगली जाते. तेव्हा तिखट आणि लिंबाच्या आंबट वासाने घरात किडे, बॅक्टेरिया येत नाही. ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. जेव्हा तब्येत चांगली असेल तेव्हा कामंही चांगली होतात. त्याने सफलतेच्या मार्गातील अडथळे कमी होतात.
अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची कारणं आपल्याला माहिती नसताना आपण त्या फॉलो करतो. पण कोणतीच प्रथा अशीच पडत नाही. त्यामागे काही ना काही कारणं लपलेली असतात. आज अशाच अनेक गोष्टी जाणून घेऊया ज्या आपण करतो तर खरं पण आपल्याला त्यामागची वैज्ञानिक कारणं माहिती नसतात. आज अशीच वैज्ञानिक तथ्य जाणून घेऊया.
प्रवासा दरम्यान अनेकदा आपण पाहिलं असेल की जेव्हा ट्रेन किंवा बस नदी किंवा एखाद्या पुलाच्या जवळून जाते. तेव्हा अनेक लोक त्यात नाणी टाकतात. पण, असं का करतात याबाबत आपल्याला माहिती नाही. खरंतर, पूर्वीच्या काळी तांब्याची नाणी होती. ताब्याने पाणी शुद्ध होतं असं म्हणतात. त्यामुळे जेव्हा नदीच्या शेजारून लोक जायचे तेव्हा ते, पाणी शुद्ध होण्यासाठी ताब्याचे नाणं त्यात फेकून देत. हळूहळू ही एक प्रथा झाली. जी आजही चालते आहे. आज तांब्याची नाणी नाहीत. तरी ही अनेक लोक पाण्यात आपल्या इच्छा पूर्ण होतील याअपक्षेने नदीत नाणी फेकतात.
कुठेही जात असताना जर आपल्याला मांजर आडवी गेली, तर तिथे काही वेळ उभं राहून नंतरच पुन्हा प्रवास सुरु करावा; अन्यथा कामात अडचण येते, असे म्हणतात. त्यामुळे आपल्याकडे मांजर आडवी जाणे अशुभ मानलं जाते. मांजर आडवे जाणार हे पाहून अनेकजण मार्ग बदलतात. पण असं का म्हटलं गेलंय, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत.
खरे तर पूर्वीच्या काळी लोक व्यवसायानिमित्त बैलगाडी आणि घोडे यांनी दूरवर प्रवास करत असत. रात्रीच्या वेळी मांजर जंगलातून जाताना दिसले तर तिचे डोळे चमकतात, ज्यामुळे बैल आणि घोडे घाबरतात. त्यामुळे रस्त्यावरून मांजर जाताना पाहिल्यानंतर लोक काही काळ प्रवास थांबवायचे आणि मांजर गेल्यावर पुन्हा प्रवास सुरु करायचे. हळुहळु या गोष्टीचा अर्थ बदलला आणि लोकांनी मांजर आडवे जाणे हे अशुभ मानायला सुरूवात केली. आणि ती एक प्रकारची अंधश्रद्धाच झाली.
जेव्हा एखाद्या महिलेची प्रसूती होते तेव्हा तिला ४० दिवस खोली सोडू नका असे सांगितले जाते. पण याचे कारण असे की प्रसूतीनंतर महिलेचे शरीर खूप अशक्त होते आणि तिला विशेष काळजी घेण्याची गरज असते. अशा परिस्थितीत तिला काम करायला लावले तर ती आणखी अडचणीत येईल. त्याच्या सोईसाठी हे कडक नियम केले गेले. ज्याचे आजही पालन केले जाते.
स्मशानभूमीतून परतल्यावर सर्वजण आंघोळ करतात. यालाही शास्त्रीय कारण आहे. वास्तविक, मृत शरीरात हानिकारक जीवाणू वाढतात. स्मशानभूमीत अशा अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. अशा स्थितीत तिथे उपस्थित असलेले लोक या जीवाणूंच्या संपर्कात येतात. त्यामुळे स्मशानभूमीतून परतल्यानंतर
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. यासंदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.)