ज्योतिष शास्त्रामध्ये शनि देवाला कर्मफळ दाता असं म्हटलं जातं, न्यायाची देवता अशी देखील शनि देवांची ओळख आहे. शनि देव प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे फळ देतात. असं म्हटलं जातं जर शनिदेव प्रसन्न झाले तर रंकाला देखील राजा बनवतात. मात्र जर शनि देव नाराज झाले तर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात. शनि देव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. तसेच त्याच्या कर्मानुसार दंड देखील देतात.
हिंदू धर्मानुसार प्रत्येक वार हा कोणत्याणं कोणत्या देवी- देवतेला समर्पित केलेला आहे. शनि देवांना शनिवार समर्पित आहे. धार्मिक मान्यतेनुसार जो पण व्यक्ती शनिवारच्या दिवशी पूर्ण भक्ती भावानं शनि देवांची पूजा करतो त्याला शनि देवांचा आशीर्वाद मिळतो. आयुष्यात सर्व सुखं मिळतात.घरात समृद्धी नांदते. नोकरी, व्यवसायामध्ये यश मिळतं. मात्र जर शनि दोष लागला तर तुम्ही आयुष्यभरात जेवढं कमावलं तेवढं एका क्षणात गमावण्याची वेळ तुमच्यावर येते. जाणून घेऊयात शनि दोष म्हणजे नेमकं काय आणि त्याची लक्षणं काय आहेत.
शनि दोष केव्हा लागतो?
ज्योतिष शास्त्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार कुंडलीमध्ये जेव्हा शनि वक्री असतो किंवा नीच स्थानी विराजमान असतो, तेव्हा शनि दोष लागतो. याशिवाय जर एखाद्या व्यक्तिने एखाद्या जीवाची हत्या केली असेल तर त्याला देखील शनिदोष लागतो. पत्नीचा अपमान करणे, तिचा छळ केला असता देखील शनि दोष लागतो. शनि देवांची पूजा करताना जर काही चुका झाल्या तरी देखील तुम्हाला शनि दोष लागू शकतो.
शनि देषाचे लक्षण
एखांद पूर्णत्वाला जाणाऱ्या कामामध्ये अचानक काहीतरी अडचणी येणं, कर्जामध्ये अचानक वाढ, धन-संपत्तीचा खर्च, कौटुंबीक वाद, तुम्ही कष्ट करून देखील तुम्हाला यश न मिळणं.
शनि दोष दूर करण्याचे उपाय
शनि दोष दूर करण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा, झाडाला सात प्रदक्षणा मारा. शनि देवाची भक्ती भावानं पूजा करा, प्रार्थना करा, दर शनिवारी शनि देवांना तेल अर्पन करा.