हिंदू धर्मामध्ये सापाला देवाचा अवतार मानलं जातं, सापाची पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. नागपंचमीच्या दिवशी हिंदू धर्म परंपरेनुसार नागाची पूजा केली जाते.मात्र अनेकदा आपल्या आसपास किंवा परिसरात जर साप दिसला तर भीतीमुळे आपल्या अंगावर काटा उभा राहातो. काही चुकीच्या समजुतीमुळे अनेकदा सापाला आपला जीव देखील गमावावा लागतो.परंतु तुम्ही कधी हा विचार केला आहे का, की जर साप तुमच्या स्वप्नात आला तर त्याचा आर्थ काय असतो? स्वप्नात साप येणं हे कोणत्या गोष्टीचे संकेत असतात? स्वप्नात साप दिसणं याचे शास्त्रामध्ये वेगवेगळे संकेत सांगण्यात आले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात.
स्वप्नात साप दिसणं शुभं असतं की अशुभ असा प्रश्न अनेकांना पडतो. तुमच्याही स्वप्नात जर वारंवार साप येत असेल तर त्याचा अर्थ असा होता की तुमच्या कुंडलीमध्ये पितृ दोष किंवा कालसर्प योग आहे. जर तुमच्या स्वप्नात वारंवार साप येत असेल तर ते अशुभ मानलं जातं. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शांती करण्याची गरज असते.
जर तुम्हाला स्वप्नात एकाचवेळी अनेक साप दिसले तर या स्वप्नाला अशुभ स्वप्न मानलं जातं. कारण याचा अर्थ असा होतो की एकाचवेळी तुमच्या आयुष्यात अनेक संकट येणार आहेत.तसेच तुमच्या घरात काही भांडण-तंटे उद्भवू शकतात.न्यायालयीनं प्रकरणं देखील मागे लागण्याची शक्यता असते.
जर स्वप्नात साप तुमच्या मागे लागला असेल तर त्याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमच्यावर कोणतं तरी मोठं संकट येणार आहे. असं स्वप्न अशुभं मानलं जातं.अनेकदा आपण सापाला घाबरून पळतो, मात्र तुम्ही तुमच्या स्वप्नात जर तुम्हाला साप चावलेला पाहिला तर हे स्वप्न मात्र शुभ संकेत देत.याचा अर्थ आहे की लवकरच तुमच्या आयुष्यात काहीतरी शुभ घटना घडणार आहे.जर तुमच्या स्वप्नात फना काढलेला काळा साप आला तर हे देखील शुभ संकेत आहे, याचा अर्थ लवकरच तुमच्या आयुष्यात काही तरी मोठी शुभ घटना होणारहे असं दिसतं.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)