Kabir Das Jayanti 2023 : दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला कबीर दास यांची जयंती साजरी केली जाते. यंदा संत कबीर जयंती मंगळवारी ४ जून २०२३ होणार आहे. संत कबीर दास भक्तीकाळातील प्रमुख कवी होते. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात समाजातील वाईट प्रथा दूर करण्यासाठी काही दोहे आणि कवितांची रचना केली. कबीर दास यांचे दोहे आजही प्रसिद्ध आहेत. संत कबीर यांनी आपल्या जीवनात समाजातील पाखंडी, अंधविश्वासू लोकांपासून दूर जाण्याचा संदेश दिला.
संत कबीर यांचा जन्म काशीच्या लहरतारा नावाच्या ठिकाणी झाला. ज्यावेळी कबीर दास यांचा जन्म झाला. त्यावेळी समाजात मोठ्या प्रमाणात वाईट प्रवृत्ती वाढल्या होत्या. त्यावेळी धर्माच्या नावावर काही पाखंडी लोकं काम करत होते. अशा काळात संत कबीर यांनी आपल्या रचनांमधून अंधविश्वासू लोकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळेच संत कबीर यांना आजही समाजसुधारक मानले जाते.
असं सांगितलं जातं की, संत कबीर दास हे अशिक्षित होते. स्वतः अशिक्षित असल्याचं कबीर बीजकमध्ये त्यांनी उल्लेख केला आहे. मी आजपर्यंत कधी लेखणी हातात धरली नाही. कागदही हातात धरला नाही आणि शाईलासुद्धा हात लावला नाही. तरीही चारही युगातील गोष्टी त्यांनी स्वतः सांगितल्या. त्या लेखणीकाच्या माध्यमातून लिहिल्या गेल्या. यामुळेच त्यांना समाजसुधारक मानले जाते. संत कबीर यांच्या नावावर कबीर पंथ समुदायाची स्थापना करण्यात आली. या समुदायाचे लाखो भक्त आहेत.
कबीर दास यांची जयंती त्यांच्या जन्मदिना निमित्त साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, हा पर्व ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला येतो. संत कबीर यांची जयंती फक्त देशातच नव्हे तर विदेशातही साजरी केली जाते. संत कबीर दास यांचे फॉलोवर त्यांच्या जयंतीनिमित्त दोहे आणि त्यातून महत्त्वाच्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात.