मुंबई : मंगळवारचा दिवस हा हनुमानजींना समर्पित असतो. बजरंगबली कलयुगातील साक्षात देवता आहे (What Things Are Forbidden On Tuesday) आणि ते आपल्या भक्तांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात. हेच कारण आहे की त्यांना संकटमोचनम्हटलं जातं. मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने ते अत्यंत प्रसन्न होतात आणि जीवनातील अनेक समस्या दूर करतात (What Things Are Forbidden On Tuesday).
पण ज्योतिष शास्त्रात या दिवशी काही कामं न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मान्यता आहे की ती कामं केल्याने मंगळ दोष लागतो आणि जीवनात समस्या वाढतात.
तुम्हाला पैशांची कितीही गरज असेल तरीही मंगळवारच्या दिवशी कधीही पैसे उधार घेऊ नका. मान्यता आहे की मंगळवारी घेतलेली उधारी परत करण्यात खूप त्रास होतो. त्यामुळे मानसिक तणाव वाढतो. त्याशिवाय कोणाला उधारी देऊ नये.
मंगळवारच्या दिवशी काळ्या वस्तूंचा प्रयोग करणे टाला. ज्योतिषशास्त्रात काळ्या रंगाशी संबंधित कुठलीही गोष्टी ही शनीशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं. अशात मंगळ आणि शनीची युती तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम टाकू शकते. त्यामुळे मंगळवारी काळे कपडे घालू नये. तसेच, काळी उडद डाळ, काली तिळ हे देखील खाऊ नये.
श्रृंगाराचं कुठलंही सामान मंगळवारच्या दिवशी खरेदी करणे महिलांनी टाळावं. असं केल्याने पती आणि पत्नीच्या संबंधांवर विपरित परिणाम होतो, अशी मान्यता आहे.
गुरुवारप्रमाणे मंगलवारीही केस धुणे, नखं कापणे आणि दाढी बनवण्यास मनाई आहे. असं केल्याने मंगळ दोष लागतो आणि जीवनात अनेक प्रकारच्या समस्या वाढतात, अशी मान्यता आहे.
मंगलवारच्या दिवशी मांस आणि मद्यपानाचं सेवन करणे नुकसानदायक मानलं जातं. मंगळ ग्रहाला उग्र स्वभावाचा मानला जातो. या दिवशी या वस्तूंचं सेवन केल्याने स्वभावात आक्रमकता वाढते आणि याचा थेट परिणाम हा मान-सम्मान आणि प्रतिष्ठेवर पडतो.
1. मंगळवारी हनुमानजींची पूजा करा. त्यांना तुपाचा दिवा लावा, इत्र, गुलाबाचा हार अर्पित करा. बेसन किंवा बुंदीचे लाडू बनवून त्याचा प्रसाद चढवा. त्यानंतर हनुमान चालीसा, सुंदरकांडचं पठन करा आणि प्रभूकडे आपल्या समस्या दूर करण्याची प्रार्थना करा. .
2. शक्य असल्यास या दिवशी हनुमानजींना चोला चढवा. चोला हनुमानजींना अत्यंत प्रिय आहे आणि हा समर्पित केल्याने ते लवकर प्रसन्न होतात. त्याशिवाय हनुमान मंदिरात बसून रामरक्षास्तोत्राचं पठन करा. त्यामुळे जीवनाच्या समस्या सुटतात.
शनैश्चरी अमावस्या : शनिच्या साडेसातीने त्रस्त आहात?, ‘हे’ उपाय करा, दूर होतील सर्व समस्याhttps://t.co/86R70CiGZL#Shanidev #ShanichariAmavasya
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2021
What Things Are Forbidden On Tuesday
संबंधित बातम्या :
Kumbh Mela 2021 : ‘कुंभ मेळा’, पहिलं शाही स्नान संपन्न, जाणून घ्या पुढील शाही स्नानाची तारीख
Mahashivaratri 2021 | महाकालेश्वराची जगप्रसिद्ध ‘भस्म आरती’, वाचा कशी सुरु झाली ‘ही’ आरती…
Mahashivratri 2021 | अशाप्रकारे करा महादेवाची पूजा लवकरच होईल कृपा, मात्र ‘या’ चुका करणे टाळा!