जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर मन शांत राहणे आवश्यक आहे. कठीण परिस्थितीत धैर्य आणि शांतीने मनातील प्रश्न सोडवले जातात. असं म्हटलं जातं की, मनापेक्षा चंचल काही नसते. कोणत्या ना कोणत्यातरी गोष्टीवरून मनात उत्सुकता असते. कित्तेक महापुरुषांचं म्हणण आहे की, ज्यानं मनाला नियंत्रित केलं तो यशस्वी होतो. छोट्या-छोट्या गोष्टींवरून व्यक्ती विचलीत होत असतो. कठीण परिस्थितीत व्यक्तीचे मनावरील नियंत्रण सुटते. मनात राग निर्माण होतो. यामुळं आपलचं नुकसान होतं.
मनात राग असेल तर आपल्यालाचं त्याचं नुकसान होतं. मनात राग असताना कोणताही निर्णय घेऊ नका. यासाठी काय करता येईल ते जाणून घ्या.