कधी आहे फाल्गुण महिन्यातील संकष्टी चतुर्थी? तिथी आणि शुभ मुहूर्त

| Updated on: Aug 13, 2024 | 5:16 PM

धार्मिक मान्यतांनुसार, माता पार्वती काही कारणाने भगवान शंकरांवर कोपली होती. भगवान शिवाने माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत ठेवले होते, त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होऊन शिवलोकात आली. हे व्रत देवी पार्वतीला तसेच गणेशालाही प्रिय आहे, म्हणून याला द्विजप्रिया चतुर्थी असेही म्हणतात.

कधी आहे फाल्गुण महिन्यातील संकष्टी चतुर्थी? तिथी आणि शुभ मुहूर्त
चतुर्थी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी यासारखे अनेक सण गणेशाला समर्पित केले जातात. पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला (Chaturthi) द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. या वर्षी फाल्गुन महिन्याची संकष्टी चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त आणि महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.

संकष्टी चतुर्थी कधी असते?

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 28 फेब्रुवारी रोजी पहाटे 1:53 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 फेब्रुवारीला पहाटे 4:18 वाजता समाप्त होईल. त्यामुळे २८ फेब्रुवारी रोजी संकष्टी चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे.

शुभ वेळ

या दिवशी गणपतीची पूजा करण्यासाठी दोन शुभ मुहूर्त आहेत. पहिला सकाळी 6.48 ते 9.41 पर्यंत आहे. दुसरा मुहूर्त 4:53 ते 6:20 पर्यंत आहे. या दोन मुहूर्तांमध्ये तुम्ही विधीनुसार गणपतीची पूजा करू शकता. 28 फेब्रुवारी रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री 9:42 आहे. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी गणेश चालीसा आणि गणेश आरतीचे पठण करा.

हे सुद्धा वाचा

संकष्टी चतुर्थीचे महत्व

धार्मिक मान्यतांनुसार, माता पार्वती काही कारणाने भगवान शंकरांवर कोपली होती. भगवान शिवाने माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत ठेवले होते, त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होऊन शिवलोकात आली. हे व्रत देवी पार्वतीला तसेच गणेशालाही प्रिय आहे, म्हणून याला द्विजप्रिया चतुर्थी असेही म्हणतात. असे मानले जाते की जो कोणी या दिवशी गौरी-गणेशाची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याचे सर्व संकट दूर होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)