असं मानलं जात की हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म आहे. या धर्मामध्ये ज्ञानाचं अघात भंडार आहे. हिंदू धर्म ग्रंथांमध्ये चार वेदांना महत्त्वाचं स्थान आहे. या धर्मात विपूल आणि अतिप्राचीन ग्रथसंपदा आढळून येते. हा धर्म अतिप्राचीन असल्यामुळे धर्मात विविध जाती, आणि संप्रदाय देखील आढळून येतात. यातीत काही संप्रदाय हे विठ्ठलाला मानणारे अर्थात विष्णूची पूजा करणारे आहेत, तर काही पंथ हे महादेवाचे भक्त असतात. हिंधू धर्मात अनेक साधू-संत होऊन गेले. सांधू-सतांची मोठी परंपरा या देशाला लाभली आहे. मात्र यात दोन पंथांची सतत चर्चा होत असते, ती म्हणजे आघोरी आणि दुसरा नागा साधू अनेकदा आपण नागा साधुंनाच आघोरी समजण्याची चूक करतो. मात्र त्यांच्यामध्ये अनेक फरक असतात, ज्यावरून आपण सहज नाग साधू आणि आघोरी यामधील फरक ओळखू शकतो.
आघोरी आणि नागा साधू हे दोन्ही भगवान शिव अर्थात महादेवाचे भक्त असतात. ते आपलं संपूर्ण आयुष्य भगवान शिवाच्या अर्थात महादेवाच्या साधनेत आणि नामजपपासाठी समर्पित करतात. मात्र दोन्ही मध्ये फरक असतो. असं मानलं जात की नागासाधू हे जगाच्या कल्याणासाठी भगवान शिवाची उपासना करतात. ते हिमालयातच राहतात. ते केवळ सात घरं माधुकरी मागून आपल्या भोजनाची व्यवस्था करतात. दुसरीकडे मात्र आघोरी पंथाचं असं नसतं. ते फक्त स्मशान भूमीतच राहतात. आघोरी विद्या प्राप्त होण्यासाठी तंत्र-मंत्रांची साधना करतात. असं मानलं जात की मृतदेहाच्या कवटीतूनच ते पाणी पितात आणि मृतदेहाचं मासं देखील खातात त्यामुळे त्यांच्यातील शक्ती वाढते असं त्यांना वाटतं, मात्र ही माहिती ज्या पूर्वपार कथा चालत आहेत, त्यावर आधारीत आहे. याबाबत अधिकृत असा कोणताही ठोस पुरवावा नाही.
नागा साधूमधील अनेक जण हे शाखाहारी असतात, मात्र आघोरी हे शाखाहारी नसतात, ते जनावारंच्या मासांसोबच मृतदेहाचे मांस देखील खातात असं मानलं जातं. नागा साधू कधीच अंगावर कपडे घालत नाहीत, मात्र आघोरी पंथात अशी कोणतीही सक्ती नसते, ते कपडे घालू शकतात. आघोरी हे तीन प्रकारची तंत्रसाधना करतात, एक शिव साधना, शमशान साधना आणि तिसरी शव साधना. मात्र नागासाधू मात्र फक्त शिव साधना करतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)